मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पती असावा तर असा! जेनेलिया करणार 10 वर्षांनी कमबॅक, पत्नीसाठी रितेश करणार मराठी सिनेमाचं दिग्दर्शन

पती असावा तर असा! जेनेलिया करणार 10 वर्षांनी कमबॅक, पत्नीसाठी रितेश करणार मराठी सिनेमाचं दिग्दर्शन

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh). पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 डिसेंबर : अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh). पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबद्दल खुलासा केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटात पत्नी जेनेलिया (Genelia Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रितेश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. पत्नी जेनेलिया (Genelia Deshmukh) व मुलांसोबत काही मजेदार व्हिडिओ व फोटो देखील तो शेअर करत असतो. आता त्याने एक पोस्ट करत त्याच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेश एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून त्याची पत्नी जेनेलिया तब्बल 10 र्षांनंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. जेनेलियाने देखील सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.तिनं यासंबंधी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

वाचा : फायनली स्वीटू येणार नांदायला तेही ओमच्या घरी; लग्नाचा video व्हायरल

रितेश देशमुखने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,वर्ष 2001साधारण 20 वर्षापुर्वीची गोष्ट. मी कॅमे-यासमोर उभा राहिलो होतो. तेव्हा मनात भिती, उत्सुकता आणि जिद्द होती. पण ते स्वप्न होतं. काहींना वाटलं कि हा वेडेपणा आहे. नंतर आपण सगळ्यांनी अनेक आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे #वेड जिंवत ठेवलं.वर्ष 2021. मी कॅमे-याच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय. मनात तशीच भिती, उत्सुकता आणि जिद्द आहे.पुन्हा आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असु द्या. परत एक स्वप्न पाहतोय. परत नवं #वेड मांडतोय.रितेश विलासराव देशमुख.

वेडच्या माध्यमातून रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर जेनेलिया दाह वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. या चित्रपटाचा पहिला टेक रितेशची आई यांच्याकडून देण्यात आला तर अॅक्शन म्हणताना रितेशचा मुलगा दिसला. या चित्रपटाचा मुहूर्त जेनेलियाचा हातून करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

यावेळी जेनेलियाचा चित्रपटातील फर्स्ट लुक देखील समोर आला. या चित्रपटाचं नाव वेड असून याची प्रस्तुती मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. जेनेलियाला मराठी सिनेमात पाहण्याची उत्सुकता आहे पण तिची भूमिका काय आहे याबद्दल देखील सर्वांना उत्सुकता आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment