Home /News /entertainment /

मोदी सरकारच्या त्या निर्णयामुळे Riteish Deshmukh झाला होता बेरोजगार; अभिनेत्याचा मोठा खुलासा

मोदी सरकारच्या त्या निर्णयामुळे Riteish Deshmukh झाला होता बेरोजगार; अभिनेत्याचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) याने भारतात एका अॅपवर बंदी घातल्यामुळे तो बेरोजगार झाल्याचे वक्तव्य केलं आहे. सध्या त्याचं हे वक्तव्य सगळीकडे चर्चेत आहे.

  मुंबई, 21 ऑक्टोबर:  बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो अनेक विनोदी व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे विनोदही नेटिझन्सना टेंशन फ्री करत असतात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये रितेश टिक टॉक या अॅपवर आला होता. पत्नी जिनिलिया देशमुख सोबत अनेक व्हिडिओ त्याने टिक टॉकवर शेअर केले होते. या व्हिडिओंना लोकांची चांगली पसंती मिळत असल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत होते. परंतु, त्यानंतर टिक टॉक (tiktok) अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली. याबाबतच रितेशने केलेल्या एका मजेशीर वक्तव्याची चर्चा होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

  रितेश म्हणाला होता की,"टिक टॉक बंद झाल्यानंतर तो बेरोजगार झाला होता. परंतु, इन्स्टाग्रामवरील रील्स फीचर आल्यापासून त्याला पुन्हा काम मिळालं." दरम्यान, लॉकडाऊन काळात रितेश आणि जेनिलिया जोडीने टिक टॉक व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांचं मनोरंजन केलं आणि लोकांना खळखळून हसायला लावलं होतं. त्यांचे हे व्हिडिओ अजूनही व्हायरल होत असतात. वाचा :  'कलाकाराला तुमच्या राज्यात...', अपघातानंतर वर्षा दांदळेंची CM ठाकरेंसाठी पोस्ट ‘मॅशबेल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला की, "लॉकडाऊनच्या काळात सगळेच कठीण प्रसंगातून जात होते. अशात आम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा विचार केला. त्यासाठी आम्ही टिक टॉक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. परंतु, भारतात टिक टॉक बंद करण्यात आलं आणि असं वाटलं की मी आता बेरोजगार झालो. जे काम मी करायचो ते तर गेलं त्यामुळे असं वाटायचं की देवा आता काय करू मी. पण काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर रिल्स आले. मी म्हणालो चला रिल्स तयार करू." वाचा :  Bigg Boss Marathi च्या घरात टास्कमध्ये कोणत्या टीमचा भोपळा फुटणार? रितेश आणि जिनिलिया हे बॉलीवूडमधील क्यूट कपल असून दोघेही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात. तसेच सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विनोदी रिल्सलाही नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत असते.दोघेही सोशल मीडियावर प्रचंड  अॅक्टीव असतात. कधी त्यांच्या मुलांसोबत तर कधी एकमेंकासोबत हे कपल भन्नाट रील शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग  आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Ritesh deshmukh

  पुढील बातम्या