मुंबई, 4 मे- उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. 13वर्षीय पीडितेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. अभिनेता रितेश देशमुखनं ( riteish deshmukh ) यासंबंधी एक ट्वीट केलं आहे.
रितेश देशमुखनं ट्वीटमध्ये एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, हे खरे असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. रक्षकच भक्षक झाला तर न्याय मागायला सामान्य माणसाने जायचे कुठे. अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. यांच्यावर तात्काळ कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्या...अशी मागणी रितेशनं केली आहे.
वाचा-परीचा Vacation Mode On! मायराचा 'आज ब्लू है पानी पानी' गाण्यावर क्यूट डान्स
सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. यासंबंधी रितेशनं ट्वीट करत कडक कारवाईची मागणी केली आहे.बॉलिवूडमधील खूप कमी कलाकार आहेत जे समाजात घडणाऱ्या अशा घटनांवर व्यक्त होताना दिसतात. रितेश देशमुख नेहमीच सामाजिक भान जपताना दिसतो. रितेश नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो.
अगर यह सच है तो इससे बदतर कुछ नहीं हो सकता। रक्षक ही भक्षक बन जाए तो आम इंसान न्याय माँगने कहाँ जाए। ऐसे लोगों को सरे आम, चौराहे पर मारना चाहिए। साकार जल्द कार्यवाही करे और सख़्त से सख़्त सजा दे। https://t.co/lYuNBZB3cK
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2022
काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक माणुसकिला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. 13वर्षीय पीडितेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) टिळकधारी सरोजला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती.
वाचा-'ही' टीव्ही अभिनेत्री बनली 'खतरों के खिलाडी 12'ची पहिली स्पर्धक, जाणून घ्या
13 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, आधी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर जेव्हा ती तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा एसएचओने पोलीस ठाण्यातच तिच्यावर बलात्कार केला. पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलिसांना यापूर्वीच ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. याप्रकरणी डीआयजी स्तरावर चौकशी सुरू असून त्यांना 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Gang Rape, Marathi entertainment, Riteish Deshmukh