मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'एक छोटासा चित्रपट...', The Kashmir Files बद्दल रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत

'एक छोटासा चित्रपट...', The Kashmir Files बद्दल रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत

 'द कश्मीर फाईल्स' ( The Kashmir Files) चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात आहे.आता अभिनेता रितेश देशमुख ( riteish deshmukh ) याने देखील या सिनेमा संदर्भात एक ट्वीट केले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 15 मार्च- 'द कश्मीर फाईल्स' ( The Kashmir Files) चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात आहे. या चित्रपटावरुन दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत. सोशल मीडियावरही दोन गटांमध्ये याची चर्चा असून एक विरोधात तर दुसरा समर्थनार्थ उतरल्याचं दिसून येत आहे.  आता अभिनेता रितेश देशमुख ( riteish deshmukh ) याने देखील या सिनेमा संदर्भात एक ट्वीट केले आहे. रितेशचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

रितेश देशमुखने या सिनेमा संदर्भात ट्वीट करत म्हटलं आहे की, अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच वेळ आहे. एक छोटासा चित्रपट जो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे.अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!

वाचा-उषा नाडकर्णी ते रेणुका शहाणे ..या अभिनेत्री करतायत गॅपनंतर टीव्हीवर कमबॅक!

मागील काही दिवसांपासून देशात 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राजकीय वातावरण देखील तापलं असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमठत आहेत. या चित्रपटाला अनेकांनी विरोध देखील दर्शवला आहे. या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. देशात 'द काश्मीर फाइल्स'सारखे सिनेमे बनायला हवेत. अशा चित्रपटातून सत्य जनतेसमोर येत असतं, असं मोदींनी म्हटलं आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर आधारीत आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडिंतांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाच्या ट्रेलरच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत.11 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Riteish Deshmukh