Home /News /entertainment /

'पगार नाही, राहण्यासाठी घर नाही मग...', रितेशनं शेअर केला अंगावर काटा आणणारा मजूराचा फोटो

'पगार नाही, राहण्यासाठी घर नाही मग...', रितेशनं शेअर केला अंगावर काटा आणणारा मजूराचा फोटो

परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळत आहे. यासाठी रेल्वेसेवाही सुरू करण्यात आल्या आहेत.

    मुंबई, 04 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आहे. मात्र याचा फटका गरीब मजूरांना बसत आहे. परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळत आहे. यासाठी रेल्वेसेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्याआधीच काहींनी पायी प्रवासास सुरुवात केली आहे. यासाठी अभिनेता रितेश देशमुखंनं ट्विटरवर एक फोटो शेअर करत, या अशा कामगारांना घरी जाण्यासाठी रेल्वेची सोय करावी, अशी मागणी केली आहे. रितेशनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मजूर आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेऊनजात असल्याचे दिसत आहे. या फोटोसह रितेशनं, ‘देशातील स्थलांतरीत लोकांचा घरी परत जाण्याचा खर्च आपणच केला पाहिजे. रेल्वे सेवा मोफत दिली पाहिजे. आधीच या मजूरांना पगार नाही, राहायला घर नाही त्यात करोना व्हायरसची लागण होण्याचा धोकासुद्धा आहे’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. वाचा-'गव्हाच्या पिशवीतून पैसे पाठवणारा मी नव्हे',व्हायरल VIDEO बाबत आमीर खानचा खुलासा वाचा-VIDEO: गाणं गाणाऱ्या शाहरुखला अबरामनं असं केलं गप्प! तरीही म्हणतोय 'सब सही होगा' दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरू झाली आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: 40 दिवस व्यवस्था केली तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे. वाचा-'लुडोला दिली ओसरी...' सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोची काय आहे भानगड! तिकीट शुल्क आकारू नका, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव , पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. हे मजूर रोजीरोटी कमावणारे व हातावर पोट असणारे आहेत. ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था, व संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Riteish Deshmukh

    पुढील बातम्या