रितेश देशमुखनं केली सलमान खानची नक्कल, व्हायरल झाला Tik Tok Video

रितेश देशमुखनं केली सलमान खानची नक्कल, व्हायरल झाला Tik Tok Video

लॉकडाऊनमुळे रितेश देशमुख सध्या कुटुंबासह गेल्या एक महिन्यापासून त्याच्या पाहुण्यांकडे अडकून पडला आहे. पण सोशल मीडियावर तो खूप सक्रिय आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी तो सोडत नाही. मागच्या काही काळापासून रितेशचे टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. पण सध्या त्याचा एक टिक टॉक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं बॉलिवूडच्या भाईजान आणि आसमा रफी ची नक्कल करताना दिसत आहे.

रितेश देशमुखनं नुकताच एक टिक टॉक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो सलमान खान आणि सारेगमप स्पर्धक आसमा रफीची नक्कल करताना दिसत आहे. रितेशचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सलमान आणि आसमा रफी बऱ्याच वर्षांपूर्वी सारेगमप शोमध्ये भेटले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये जो संवाद झाला होता त्याचाच टिकटॉक व्हिडीओ रितेशनं बनवला आहे जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

@riteishd##salmankhan ##humor

♬ original sound - الفو الفو

सलमान खाननं या शोमध्ये आसमाला अरबीमधील त्याचं लोकप्रिय गाणं चुनरी चुनरी गायला सांगितलं. रितेशनं त्याच्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादाची नक्कल केली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी रितेशनं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्याची बायको जेनेलिया डिसूझा त्याच्याकडून भांडी घासून घेत असताना दिसत होती. तर बॅकग्राऊंडला 'मौका मिलेगा तो हम बता देंगे' हे गाणं सुरू होतं.

@riteishd##lockdown ##stayhome ##staysafe ##marathi

♬ original sound - ️v@dHuT_N@Rv@tE

@riteishd##stayhome reality @geneliad ##happybirthday ##ajaydevgan ##comedy

♬ original sound - riteishd

@riteishdLove in lock-down @geneliad

♬ original sound - farzan_07

रितेश देशमुख सध्या आपल्या कुटुंबासह गेल्या एक महिन्यापासून आपल्या पाहुण्यांकडे लॉकडाऊनमुळे अडकून पडला आहे. 20 मार्च रोजी चार दिवस हवापालट करण्यासाठी रितेश कराडमध्ये आला होता मात्र कोरोनामुळे अचानक लॉक डाऊन करण्यात आले आणि अतुल भोसले यांच्या उत्तरा भवन बंगल्यावर रितेश आपल्या पत्नी जेनेलिया आणि मुलं राहिल-रिहान सोबत अडकला आहे. असं असलं तरी तो आपल्या कुटुंबासह लॉकडाऊनचं पालन करताना आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

(संपादन- मेघा जेठे)

रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे लातूरऐवजी अडकला या ठिकाणी, Video मुळे झाला खुलासा

अरजित सिंहची छोटीशी चूक आणि भाईजानशी दुश्मनी, काय आहे दोघांमधील भांडणाचं कारण

First published: April 25, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या