"सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही", रितेश देशमुखची रिया प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया
सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला (rhea chaktaborty) अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. आता रितेश देशमुखने तिच्याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 12 ऑक्टोबर : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात रिया नुकतीच जेलमधून बाहेर आली आहे. त्यावेळीदेखील अनेक सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता रितेश देशमुखनेही (riteish deshmukh) तिचं समर्थन केलं आहे.
रिया चक्रवर्तीने तिच्या शेजाऱ्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केल्यानंतर रितेशने ही प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुखने ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे. "तुझ्याकडे खूप सामर्थ्य आहे @Tweet2Rhea. सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही"
रिया चक्रवर्तीची शेजारीण डिंपल थवानीने सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस, म्हणजे 13 जूनला रियाला आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचं सांगितलं होतं. सीबीआय टीमने डिंपल थलावीची चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक दिवस सुशांत आणि रियाला एकत्र पाहिले का? असा सवाल जेव्हा सीबीआयने डिंपलला विचारला तेव्हा तिने असं काहीच पाहिलं नसल्याचं सांगितलं. रिया आणि सुशांत आत्महत्येपूर्वी भेटले होते. असं मी कोणाकडून तरी ऐकलं होतं, असा जबाब तिने दिला. बदललेल्या जबाबामुळे तपासाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.
7 ऑक्टोबरला रियाची जेलमधून सुटका झाली आहे. जवळपास महिनाभराने तिला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या WhatsApp चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. तिला सशर्त जामीन देण्यात आला आहे. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला. तर रियाचा भाऊ शोविक आणि अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. .