Home /News /entertainment /

‘मस्ती’ची17 वर्षं, रितेश देशमुखने जुन्या सहकाऱ्यांबरोबर पुन्हा केली मस्ती, पाहा LIVE VIDEO

‘मस्ती’ची17 वर्षं, रितेश देशमुखने जुन्या सहकाऱ्यांबरोबर पुन्हा केली मस्ती, पाहा LIVE VIDEO

2004 साली आलेल्या ‘मस्ती’ (masti) या चित्रपटाच्या आठवणी जाग्या करताना रितेशबरोबर अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi), आफताब शिवदासानी (Aftab shivdasani) यांनी काय धमाल केलीय पाहा LIVE VIDEO

  मुंबई, 10 एप्रिल – अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh)  नुकतचं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लाइव्ह सेशन (Instagaram live session) केला. तर यामध्ये त्याने 2004 साली आलेला ‘मस्ती’ (masti) या चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. रितेश सोबत अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi), आफताब शिवदासनी (Aftab shivdasani) आणि चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार (Indra kumar) हे देखील जोडले गेले होते. 9 एप्रिल 2004 ला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चौघांनाही चित्रपटाची 17 वर्षे एकत्र येत साजरी केली. रितेश, विवेक आणि आफताब हे तिघेही मुख्य भूमिकेत असलेला मस्ती चित्रपट होता. याखेरीज अभिनेत्री अमृता राव (Amruta Rao), जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh), तारा शर्मा (Tara sharma), अजय देवगण (Ajay Devgn), लारा दत्ता (Lara Dutta) हे कलाकार देखील होते. कुटुंबापासून वेगळी मस्ती करण्याच्या नादात अडकलेले नवरे अशी एकंदरीतच चित्रपटाची कथा होती. विनोदी चित्रपट होता तर प्रेक्षकांची चित्रपटाला चांगली दाद मिळाली होती. रितेश, विवेक, आफताब आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी इन्स्टाग्राम वर लाइव्ह येत एकमेकांशी गप्पा मारल्या तसेच जुन्या आणि चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. तर रितेशने सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं होत.
  View this post on Instagram

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

  मस्ती या चित्रपटाच्या यशानंतर मस्तीचे आणखी सिक्वल्स काढण्यात आले. ‘ग्रॅन्ड मस्ती’ (Grand masti) आणि ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’ (Great grand masti). या चित्रपटांना देखिल चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर आजही मस्ती चित्रपटाचे चाहते आहेत.

  मनिष पॉलची धम्माल मस्ती; पुरस्कार सोहळ्यात सनी लिओनीसोबत केला डान्स

  एक व्हिलन रिटर्न्स या आगामी चित्रपटात रितेश दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. तर अभिनेता विवेक ऑबेरॉय हा अभिनयाव्यतिरीक्त इतर उपक्रमांमध्ये जास्त सहभागी असतो त्याबद्दलची माहिती तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असतो. अभिनेता अफ्ताब हा चित्रपटसृष्टीपासून सध्या बराच काळ दूर आहे,
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या