रितेश देशमुख घेऊन येतोय 'माऊली' !

रितेश देशमुख घेऊन येतोय 'माऊली' !

'माऊली'चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून हा चित्रपट आमच्यासाठी खरंच मोलाचा आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : 'लय भारी'या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं आहे. लय भारी या सिनेमाची निर्मिती रितेशच्या पत्नीने म्हणजे जेनेलिया देशमुखनी मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली केली होती. आता परत जेनेलिया देशमुख एका नविन मराठी सिनेमाची निर्मिती करत आसून या सिनेमाच्या माध्यमातून रितेश परत एकदा प्रेक्षकांना मराठी सिनेमात भूमिका साकारताना दिसणार आहे.

या मराठी सिनेमाचे नाव 'माऊली' असं असणार आहे. 'माऊली'चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून हा चित्रपट आमच्यासाठी खरंच मोलाचा आहे. त्यामुळे 'माऊली' आमच्यासाठी महत्वाकांक्षी चित्रपट आहे, असे जेनेलियाने ट्विटर करत सांगितलं आहे.

लय भारी सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता मराठीत अभिनय करण्याची माझी उत्सुक्ता अजूनच वाढली आहे. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे 'माऊली' चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतल्याचे रितेशने सांगितलं.

First published: May 2, 2018, 11:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading