• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'कुशीत नसतं पिल्लू तेव्हा...'; रितेश देशमुखनं व्हिडीओ शेअर करत दिल्या मदर्स डेच्या शुभेच्छा

'कुशीत नसतं पिल्लू तेव्हा...'; रितेश देशमुखनं व्हिडीओ शेअर करत दिल्या मदर्स डेच्या शुभेच्छा

एका व्हिडीओद्वारे आपल्या आईला जागतिक मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (International Mother's Day 2021) त्याचा हा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 • Share this:
  मुंबई 9 मे: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच त्यानं एका व्हिडीओद्वारे आपल्या आईला जागतिक मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (International Mother's Day 2021) त्याचा हा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रितेशनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या आईसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. सोबतच यामध्ये त्याच्या बालपणीचे काही फोटो देखील त्यानं शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो आपल्या आईसोबत दिसत आहे. तसेच या व्हिडीओवर त्यानं चिंटू चित्रपटातील घाबरलीस ना आई हे गाणं बॅकग्राउंड स्कोअर म्हणून वापरलं आहे. या व्हिडीओद्वारे त्यानं आपल्या बालपणींच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा दिला आहे. त्याच्या या व्हिडीओवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट
  View this post on Instagram

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

  मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीनं तिच्या आईचे स्मारक बांधलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. तेव्हापासून संपूर्ण जगात हा दिवस मातृदिन म्हणून जरा केला जातो.
  Published by:Mandar Gurav
  First published: