मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Riteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल; जाणून घ्या डिटेल्स

Riteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल; जाणून घ्या डिटेल्स

नुकताच रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया मुलांचा डान्स शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४'मध्ये सहभागी झाले होते.

नुकताच रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया मुलांचा डान्स शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४'मध्ये सहभागी झाले होते.

नुकताच रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया मुलांचा डान्स शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४'मध्ये सहभागी झाले होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 26 सप्टेंबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia Dsouza) ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही नेहमीच चर्चेत असतात. सध्या दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. जेनेलिया आणि रितेश सतत आपल्या नात्यातील रुसवे-फुगवे, प्रेम यांच्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांनाही यांचं प्रेम खूप पसंत पडत. चाहते यांच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेम देत असतात. मात्र अनेक दिवसांपासून दोघेही एकत्र सिल्वर स्क्रीनवर झळकलेले नाहीत. चाहत्यांची ही इच्छासुद्धा लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. जेनेलियाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

नुकताच रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया मुलांचा डान्स शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४'मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. दोघांनीही आपल्या लव्हस्टोरीच्या सुरुवातीबद्दल सर्वांना सांगितलं होतं. तसेच या दोघांमध्ये जवळीकता कशी निर्माण झाली याचादेखील खुलासा ककेला होता. तसेच आपल्या लव्हस्टोरीतील आणि वैवाहिक आयुष्यातील अनेक रंजक किस्सेसुद्धा सर्वांशी शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांच या जोडीवरल प्रेम द्विगुणित झालं होतं. तसेच चाहते या जोडीला पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी धडपडत आहेत. मात्र चिंतेचं कारण नाही. कारण चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी चिन्हे दिसू लागली आहे. अभिनेत्री जेनेलियाने स्वतः याचे संकेत दिले आहेत.

(हे वाचा:सोनम कपूरच्या आयुष्यात SOMEONE SPECIAL ची एन्ट्री; म्हणाली,आता प्रतीक्षा नाही...)

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, जेनेलियाला विचारण्यात आलं होतं. चाहते तुम्हाला आणि रितेशला एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यावर काय सांगाल? तेव्हा जेनेलियाने उत्तर दिल आहे, 'मला अपेक्षा आहे, कि लवकरच असं होईल.वर्षाच्या शेवटपर्यंत असं होऊ शकेल. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. याआधीही जेनेलियाने स्वतः सांगितलं होतं, मला रितेशसोबत काम करायचं आहे. मात्र एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत आहे'. या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट नक्की हे रिअल लाईफ क्युट कपल लवकरच पुन्हा एकदा पडद्यावर दिसून येणार आहे.

(हे वाचा:PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर राखी सावंतने केली खास डिमांड; पाहा मजेशीर VIDEO)

जेनेलिया आणि रितेशने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणीही खूपच हिट ठरली होती. या चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया आणि रितेश पहिल्यांदा भेटले होते. नंतर या दोघांनी 'मस्ती'मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनतर २०१२ मध्ये आलेल्या 'तेरे नाल लव्ह हो गया' या चित्रपटात हे शेवटचं एकत्र झळकले होते. २०१२ मध्येच यांनी लग्नगाठ बांधली होती. आज या दोघांनी २ मुले आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Riteish Deshmukh