मुंबई, 03 फ्रेबुवारी : सध्या संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारं मराठमोळ कपल म्हणजे रितेश आणि जिनिलिया. त्यांचा वेड हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. सिनेमा आतापर्यंत 70 कोटींची कमाई केली आहे. रितेश आणि जिनिलिया आज त्यांच्या लग्नाची दहा वर्ष सेलिब्रेट करत आहेत. लग्नाच्या वाढदिवसासाठी दोघेही खास ठिकाणी फिरायला गेलेत. लग्नाचा वाढदिवस दोघे सेलिब्रेट करत आहेत. रितेश आणि जिनिलियाची ही जोडी त्यांच्या रील्समुळेही चर्चेत असते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्यांचा रील नाही आला असं होणार नाही.
रितेश आणि जिनिलिया लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास ट्रेकिंगला गेले आहेत. जिनिलियानं ट्रेकिंग ब्रेकमधील व्हिडीओ शेअर केलाय. अनिव्हर्सरी मॉर्निंग दोघांनी निसर्गाच्या सानिध्यात सुरू केली. दोघांनी एकमेकांना हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. रितेशनं दोघांचा गोड फोटो शेअर केलाय. 'माझा आनंद, माझी सुरक्षित जागा, माझं आयुष्य...लग्नाच्या 11व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको',असं रितेशनं म्हटलंय.
हेही वाचा - लग्नाच्या चौथ्याच दिवशी जिनिलिया म्हणाली होती हे नाही करू शकत; 10 वर्षांनी रितेशनं केला खुलासा
तर जिनिलियानं भन्नाट रील शेअर केलाय. 'Anniversary के दिन एक reel तो बनता है !!!!', असं कॅप्शन तिनं व्हिडीओला दिलंय. ज्यात जिनिलिया रितेशला म्हणते, 'तुझ्यासाठी मी सगळ्या जगाशी भांडू शकते'. रितेश म्हणतो, 'पूर्ण दिवस तर तू माझ्याशी भांडत असते'. त्यावर जिनिलिया म्हणते, 'तुम्हीच तर माझं जग आहात'. जिनिलियाच्या या वाक्यानंतर दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघतात. संपूर्ण रीलमधील दोघांच्या एक्सप्रेशन्सनी चांगलीच मज्जा आणली आहे.
View this post on Instagram
जिनिलिया आणि रितेश यांची ओळख तुझे मेरी कसम या सिनेमाच्या सेटवर झाली. दोघांचाही तो पहिला सिनेमा होता. तिथे झालेल्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. 9 वर्ष डेटिंग आणि त्यानंतर 10 वर्षांचा यशस्वी संसार त्यांनी केलाय. नात्याची 20 वर्ष आणि लग्नाची 10 वर्ष रितेश आणि जिनिलिया आज साजरी करत आहेत. दोघांवरही सिनेसृष्टी आणि चाहत्यांकडून शुभेच्छा, आशिर्वादाचा वर्षाव होतोय.
रितेश आणि जिनिलिया यांनी 3 फेब्रुवारी 2012 साली लग्न केलं. अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं दोघांचं शाही लग्न झालं होतं. अनेक राजकीय आणि कलाकार मंडळी दोघांच्या लग्नाला आले होते. दोघांना दोन मुलं आहेत. रिआन आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत. दोघांवरही त्यांनी उत्तम संस्कार केलेत. दोन्ही मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news