मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आधी केला डान्स अन् मध्येच सुरू झाली हाणामारी..; रितेश-जेनेलियाचे भन्नाट Reel Viral

आधी केला डान्स अन् मध्येच सुरू झाली हाणामारी..; रितेश-जेनेलियाचे भन्नाट Reel Viral

भिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

भिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

भिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 26 फेब्रुवारी-  अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. जेनेलिया सोशल मीडियवर भन्नाट रील्स (reel ) शेअर करत असते. सोशल मीडियावर जेनेलियाचा प्रचंड चाहता वर्ग आहे.

नुकताच जेनेलियाने एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया आणि रेतेश धमाल मस्ती करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  सुरूवातील रितेश अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली या गण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे सगळं सुरू असताना जेनेलिया मध्येच येते आणि एक बार आजा आजा … aaaaaaaaaआजा ...या गाण्यावर डान्स करायला सुरूवात करते. डान्स सुरू असतानाच या दोघांचे मध्येच खटकते. मग जेनेलिया रितेशला धक्का देते. यानंतर डान्स राहिला बाजूल आणि त्यांची हाणामारी सुरू होते. खरं तर हा व्हिडिओ फनी आहे. मजेदार अंदाजात या दोघांनी हा व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटसह लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलिया आणि रितेशने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणीही खूपच हिट ठरली होती. या चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया आणि रितेश पहिल्यांदा भेटले होते. नंतर या दोघांनी 'मस्ती'मध्ये एकत्र काम केलं होतं. हे जोडपे 15 वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. त्यांनतर २०१२ मध्ये आलेल्या 'तेरे नाल लव्ह हो गया' या चित्रपटात हे शेवटचं एकत्र झळकले होते. 3 फेब्रुवारी 2012 रोजी त्यांचे लग्न झाले आणि त्यांना राहिल आणि रियान ही दोन मुले आहेत.

वाचा-'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट

अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातील गाणी असतील स्टाईल असेल किंवा डायलॉग असतील सर्वच हिट झाली आहेत. सोशल मीडियावर याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण यावर रील्स बनवताना दिसत आहे. अगदी सर्वसामान्य जनता ते कलाकार सर्वांनाच पुष्पाने वेड लावलं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Riteish Deshmukh