मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : रितेश-जेनेलियाचा सुरू होता रोमान्स; दोघात तिसरा 'तो' आला आणि लागली वाट

VIDEO : रितेश-जेनेलियाचा सुरू होता रोमान्स; दोघात तिसरा 'तो' आला आणि लागली वाट

रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) सोडून जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) त्या तिसऱ्यालाच...

रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) सोडून जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) त्या तिसऱ्यालाच...

रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) सोडून जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) त्या तिसऱ्यालाच...

  • Published by:  Priya Lad

मुंंबई, 08 जुलै : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) हे बॉलिवूडमधील एक क्युट कपल (Bollywood couple). त्यांच्या नात्यातील गोड केमिस्ट्री सतत पाहायला मिळते. हे दोघंही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आपले फोटोज आणि व्हिडिओ दोघं आवर्जून सोशल मीडियावर (social media) शेअर करत असतात. सध्या दोघांचाही असात एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे (Riteish and Genelia Video) .

जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रितेशसोबतचा आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोघंही रोमँटिक अंदाजात आहेत. एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. पण या दोघांमध्ये तिसराच कुणीतरी येतो आणि त्यांचा रोमान्सची वाट लावतो.

व्हिडीओत पाहू शकता, जेनेलिया-रितेश एकमेकांमध्ये हरवून गेले आहेत. दोघंही हळूहळू एकमेकांच्या जवळ येतात. डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. दोघंही एकमेकांना किस करण्याच्या तयारीतच आहेत. इतक्यात या दोघांमध्ये तिसरा तो येतो आणि मग काय त्यांच्या रोमान्समध्ये खंड पाडतो.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

हा तिसरा तो म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा आहे. दोघंही जेव्हा रोमँटिक मूडमध्ये असतात. तेव्हा त्यांचा हा डॉग त्यांच्यासोबतच होता. त्या दोघांच्या अगदी मध्ये. जेव्हा दोघंही जवळ येतात तेव्हा हा कुत्रा त्यांच्यामध्ये येतो आणि दोघांच्या गालावर आपल्या जिभेने चाटू लागतो. तेव्हा जेनेलियाला हसूच कोसळतं. ती आपल्या कुत्र्याला जवळ घेते, त्याला मिठी मारते आणि त्याच्या डोक्यावर गोड पापी देते.

हे वाचा - ही ग्लॅमरस अभिनेत्री होणार बाहुबलीची आई; 200 कोटींच्या सीरिजसाठी करतेय खास तयारी

यावेळी रितेशच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र पाहण्यासारखे आहेत. त्यातही जेनेलिया जेव्हा कुत्र्याला गोड पापी देते तेव्हा तर त्याचा चेहरा अधिकच उदास होतो. मग जेनेलिया हसत हसत रितेशच्याही गालावर किस करते आणि त्याला मिठी मारते. तेव्हा कुठे रितेशच्या चेहऱ्यावर हसू फुलतो आणि तोसुद्धा आपल्या कुत्र्याला प्रेमाने मिठी मारतो.

रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम या सिनेमातून 2003 साली डेब्यू केला होता. तेव्हापासूनच हे कपल बॉलिवूड च्या मोस्ट फेमस कपलपैकी एक आहे. आठ वर्षापूर्वी हे बीटाउन कपल 'तेरे नाल लव्ह हो गया' (Tere Naal Love Ho Gaya) या सिनेमात एकत्र दिसले होते आणि त्याच वर्षी दोघंही लग्न बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला (marriage) 8 वर्ष पूर्णे झाली आहेत. त्यांना दोन गोंडस मुलंही आहेत.

हे वाचा - 'मुझसे शादी करोगी' विकी कौशलने सलमान समोरच केलं होतं कतरिनाला प्रपोझ

डेब्यू पार्टनर टू लाईफ पार्टनर' असा यशस्वी प्रवास करणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) या बॉलिवूड कपलचे लाखो चाहते आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Riteish Deshmukh