Home /News /entertainment /

रितेश देशमुखच्या मुलांनी गांधीजींबद्दल असं काय म्हटलं, पाहा VIDEO

रितेश देशमुखच्या मुलांनी गांधीजींबद्दल असं काय म्हटलं, पाहा VIDEO

रितेश देशमुखच्या मुलांनी गांधीजींबद्दल असं काही म्हटलं की त्यांचा हा व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होत आहे.

  मुंबई, 31 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमीच स्वतःसोबतच त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रितेशनं त्याची मुलं रियान आणि राहिल यांचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. ज्यात ते दोघंही महात्मा गांधीजींबद्दल बोलताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये गांधीजींबद्दल असं काही म्हटलं की त्यांचा हा व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होत आहे. रितेश देशमुखनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात रितेश आपल्या मुलांना गांधीजींच्या महनेबद्दल सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप पसंत केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये रितेश मुलांना सांगतो गांधीजी खूप... खूप... खूप... महान होते आणि आमच्या सर्वांपेक्षा खूप मोठे होते. इतकंच नाही तर रितेशनं दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना देखील गांधीजींच्या तुलनेत लहान म्हटलं आहे. सनी लिओनीला क्रिकेट नाही तर 'या' खास कारणासाठी आवडतो कॅप्टनकुल धोनी
  View this post on Instagram

  Best pictures are clicked when no one poses for them. ..... courtesy our In-house photographer @geneliad

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

  सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना रितेशनं लिहिलं, रियान आणि राहिल महात्मा गांधीजींबद्दल माझ्याशी बोलत होते. गांधीजींची मूल्य आणि सिद्धांत अनेक पिढ्यांसाठी प्रेरक राहतील याच व्हिडीओमध्ये रितेशचा मुलगा रियान गांधीजींच्या चष्म्याबद्दल बोलतो, ‘गांधीजी खूप जवळून टीव्ही पाहत असत त्यामुळे त्यांना चष्मा लागला होता.’ यावर रितेश त्याला विचारतो तू कसा टीव्ही पाहतोस त्यावर तो म्हणतो खूप जवळून. त्याचा हा निरागसपणा मनाला भावतो. TRP मीटर मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ला दणका व्हिडीओमध्ये रितेश त्याच्या मुलाला विचारतो, जेव्हा तू बापूंना भेटशील तेव्हा त्यांना काय सांगशिल. यावर उत्तर देताना रियान म्हणतो, गांधीजी तर आकाशात राहतात. त्यामुळे मी  त्यांना भेटू शकत नाही. यानंतर रितेश त्यांना सांगतो, तुम्ही दोघंही गांधीजींना भेटू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? गांधीजी खूप... खूप... खूप... महान व्यक्ती होते. यावर रियान निरागसपणे सांगतो, हे मला माहित नव्हतं.
  रियान पुढे रितेशला विचारतो, गांधीजी आपल्या सर्वांपेक्षा मोठे होते का? यावर रितेश त्याला सांगतो, हो ते आपल्या सर्वांपेक्षा मोठे होते. ते आजीपेक्षाही मोठे होते. त्यावर लहानगा राहिल विचारतो गांधीजी आजोबांपेक्षाही मोठे होते. तर रितेश त्याला सांगतो, हो ते आजोबांपेक्षाही मोठे होते. त्यांच्या तुलनेत बाबा खूप लहान होते. नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Ritesh deshmukh

  पुढील बातम्या