Home /News /entertainment /

Video : रितेश- सिद्धार्थची महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर ग्रेट भेट

Video : रितेश- सिद्धार्थची महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर ग्रेट भेट

यंदाचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात आला.मात्र या सोहळ्यात चर्चा रंगली ती अभिनेता रितेश देशमुख (riteish deshamuk ) आणि सिद्धार्थ जाधवच्या (siddharth jadhav ) गळाभेटीची.

  मुंबई, 5 डिसेंबर- मराठी मनोरंजन (ZeeTalkies) विश्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांचे ज्या पुरस्कार सोहळ्याकडे विशेष लक्ष असते असा सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' Maharashtracha Favourite Kon या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नावीन्यतेनं नटलेल्या असतात. त्यात यंदाच्या सोहळयाची खासियत जरा वेगळी आहे. यंदाचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात आला. या सोहळयाला कलाकारांची मांदियाळी पाहायल मिळाली. मात्र या सोहळ्यात चर्चा रंगली ती अभिनेता रितेश देशमुख (riteish deshamuk ) आणि सिद्धार्थ जाधवच्या (siddharth jadhav ) गळाभेटीची. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजश्री मराठीने रितेश आणि सिद्धार्थ भेटीचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये रितेश देशमुख समोर दिसताच सिद्धार्थ जाधव त्याला अशी काय जादूची झप्पी मारतो की.. त्यावरून या दोघांच्यातील सच्ची मैत्री दिसून येते. विशेष म्हणजे यावेळी दिग्दर्शक संजय जाधव देखील तिथे येतात मग काय या तिघांच्या मैत्रिचा त्रिकोण येथेच पूर्ण होतो आणि एकमेंकासोबत फोटो काढयची चढाओढ सुरू होते. खरचं हा क्षण डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायर होत आहे आणि चाहत्यांकडून देखील यांच्या मैत्रिचे कौतुक होत आहे.
  झी टॉकीज आयोजित हा सन्मान सोहळा रसिकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतो. यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केली जाते. सध्या या सोहळ्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगलेली आहे. यासोबत या सोहळ्यातील कलाकारांच्या रेड कार्पेट लुकची देखील तितकीच चर्चा रंगली आहे. एकपेक्षा एक असा लुक यावेळी कलाकारांनी केलेला पाहायला मिळाला. वाचा : आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; कन्नड भाषेत होणार रिमेक  सिद्धार्थ जाधव आणि संजय जाधव यांच्या मैत्रिची चर्चा तर नेहमीच रंगलेली असते. आता यात रितेश देशमुखची देखील भर पडली आहे. रितेश देशमुख जरी बॉलिवूड स्टार असला तरी त्याने मराठीत देखील काम केले आहे. रितेशचा मनमिळावू स्वभाव नेहमीच सर्वांना आपलासा करून घेतो.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Ritesh deshmukh, Zee marathi serial

  पुढील बातम्या