मुंबई, 30 मार्च : शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा पठाणनं 2023वर्षाची दमदार सुरूवात केली. सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सिनेमाविषयी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. न्यूज 18च्या रायजिंग इंडिया समिट 2023कार्यक्रमात त्यांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी बोलताना बॉलिवूडच्या सध्याच्या यशामागे पठाणचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरंतर पठाण हा सिनेमा बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडच्या कचाट्यात सापडला होता. पण सिनेमा रिलीज झाला आणि त्यानं जादू केली. सिनेमानं 1000कोटींची कमाई केली. ट्रोलिंग, बॉयकॉट ट्रेंड या सगळ्यावर बोलताना सिद्धार्थ आनंदनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
पठाण सिनेमात दीपिकाला भगवी बिकिनी देण्यामागे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं काय विचार केला होता हे आता समोर आलं आहे. ते म्हणाले, "दीपिकाचा कास्ट्युम मी रॅन्डमली निवडला होता. त्यावरून इतका वाद होईल याचा मी विचारच केला नव्हता. लतो कलर चांगला वाटत होता. सूर्याचा उजेड, हिरवं गवत, निळ आकाश आणि कॉन्ट्युमचा रंग ऑरेंज. बस्स या मागे इतकंच लॉजिक होतं".
हेही वाचा - 29 वर्षात आमिर खाननं का नाही केलं सलमानबरोबर काम? इतके वर्ष लांब राहण्यामागे हैराण करणारं कारण
सिद्धार्थ आनंद पुढे म्हणाले, "मी प्रेक्षकांचे आभार मानेन की ते सिनेमा पाहायला आले. इतकं अॅडवान्स बुकींग झालं. बॉयकॉट ट्रेंडला चुकीचं ठरवलं. बॉयकॉट म्हणायला लोकांना काही वाटत नाही पण तुम्ही हा विचार करायला हवा की, एका सिनेमामुळे लाखो लोकांची पोट भरतात. माझ्या सेटवर 300 लोक काम करत होते. बॉयकॉट बोलणं फक्त सोपं असतं".
मुलाखती दरम्यान न्यूज 18 इंडियाचे मॅनेजिंग हेट किशोर अजवानी यांनी सिद्धार्थ आनंदला प्रश्न विचारला की, 1000 कोटींच्या कमाई विषयी काय मत आहे? त्यावर सिद्धार्थ आनंदनं विनोदी अंदाजात उत्तर देत म्हटलं, "मला फार छान वाटलं. पण, सगळेच पैसे मला मिळाले नाहीत. कोरोना काळात सिनेसृष्टीवर फार वाईट वेळ आली. वाईट परिणाम झाले. या काळात अनेक सिनेमे आले पण ते चालले नाहीत. अशा वेळी पठाण सारखा सिनेमा आला आणि इंडस्ट्री अजून जिवंत असल्याचं दाखवून दिलं".
त्याचप्रमाणे सिद्धार्थना तुम्ही कोणत्या प्रकारचे दिग्दर्शक आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "मी प्रेक्षकांचा दिग्दर्शक आहे. मला असा सिनेमा पाहायचा आहे की जो मी प्रेक्षकांमध्ये पाहू शकेन. प्रेक्षकांना सिनेमा पकाव वाटणार नाही, ते सिनेमा पाहताना कंटाळणार असा विचार करून मी सिनेमा लिहितो. स्क्रिप्ट वाचताना मला कळत की प्रेक्षक सिनेमा पाहताना वैतागणार नाहीत".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News