ऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची!

ऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची!

रणबीरने लवकरात लवकरच लग्न करावं अशी वडील ऋषी कपूर यांची इच्छा आहे.

  • Share this:

26 एप्रिल : ऋषी कपूरला आता घाई झालीय ती आजोबा व्हायची. छोट्या नातवंडांसोबत त्याला खेळायचंय.आणि त्याची इच्छा पूर्ण करायची जबाबदारी आहे अर्थातच रणबीरवर.

रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'संजू' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला तरी तो भलत्याच गोष्टीच्या विचारात पडलाय. रणबीरने लवकरात लवकरच लग्न करावं अशी वडील ऋषी कपूर यांची इच्छा आहे.

ऋषी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने लवकर लग्न करावं अशी इच्छा व्यक्त केलीये. तसंच रणबीरची क्युट लहान मुलं असतील आणि त्यांच्याबरोबर मी एकत्र वेळ घालवेन असं ऋषी यांनी या मुलाखतीत म्हटलंय. कितीही स्टारडमचं वलय असलं तरी ऋषी कपूर मुलाच्या बाबतीत खूपच हळवा आहे. अगदी सर्वसामान्यांसारखाच बाबा आहे. आता रणबीर वडिलांच्या इच्छेसाठी लग्नाला तयार होणार काय हे पाहाचंय.

First published: April 26, 2018, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading