पाकव्याप्त काश्मीरबद्दल ऋषी कपूर यांचं वादग्रस्त ट्विट

पाकव्याप्त काश्मीरबद्दल ऋषी कपूर यांचं वादग्रस्त ट्विट

पाकव्याप्क काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असून उरलेलं काश्मीर भारताचा भाग आहे आणि पाकिस्तानकडून ते कुणीही हस्तगत करू शकत नाही असं मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं होतं. ऋषी यांनी ट्विटरवर हाच मुद्दा उचलून धरत या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलं.

  • Share this:

विराज मुळे, 12 नोव्हेंबर : पाकव्याप्त काश्मीरबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याला ऋषी कपूर यांनी ट्विटरवर समर्थन दिलंय. ऋषी कपूर यांच्या या ट्विटचा मात्र नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतलाय.

पाकव्याप्क काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असून उरलेलं काश्मीर भारताचा भाग आहे आणि पाकिस्तानकडून ते कुणीही हस्तगत करू शकत नाही असं मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं होतं. ऋषी यांनी ट्विटरवर हाच मुद्दा उचलून धरत या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलं.

ऋषी म्हणाले, 'फारूख अब्दुल्ला जी सलाम! सर मी तुमच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपलं आहे आणि पीओके त्यांचं.आपल्या समस्येवर हा एकमेव उपाय आहे. मी आज 65 वर्षांचा झालोय, आणि मरण्याआधी एकदा पाकिस्तान पाहण्याची मला इच्छा आहे. माझ्या मुलांनी त्यांचं मूळ स्थान पहावं असं मला वाटतं. एवढं करून दाखवा. जय माता दी!'

या वक्तव्याचा ट्विटरवरील देशभक्त नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतलाय. एकानं लिहिलं की, 'सर, 65 वर्षांचं झाल्यावर नीट मारायची नसते. सोडा नसेल तर दारूत पाणी तरी टाकून पीत जा.'

तर दुसऱ्याने लिहिलं की,'चार पेग प्यायल्यानंतर ट्विटरवर येणं हे हानिकारक नाही तर जास्तच हानिकारक असतं.'

आपल्या वक्तव्यावर उमटलेल्या या प्रतिक्रियांना ऋषीजींनी प्रत्युत्तर देणं टाळलंय. मात्र पाकव्याप्त काश्मीरबाबत सोशल मीडियावर व्यक्त केलेलं हे वक्तव्य ऋषीजींवरच बुमरँग झालंय एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 06:46 PM IST

ताज्या बातम्या