ऋषी कपूर करणार अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका

ऋषी कपूर करणार अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका

उमेश शुक्ला यांच्या '102 नाॅटआऊट'मध्ये बिग बी दिसणार आहेत ऋषी कपूर यांचे वडील.

  • Share this:

08 मे : ऋषी कपूर यांना कायमच चिंटू कपूर म्हणूनच राहायचंय असं दिसतंय. म्हणून ते आता भूमिका साकारणार आहेत अमिताभ बच्चन यांच्या मुलाची. अमिताभ बच्चन ऋषी कपूरपेक्षा  फक्त 10 वर्षांनी मोठे आहेत. पण ऋषी कपूर तसेही लहान दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर हे मोठं आव्हान आहे.

उमेश शुक्ला यांच्या '102 नाॅटआऊट'मध्ये बिग बी दिसणार आहेत ऋषी कपूर यांचे वडील. अगोदर ही भूमिका परेश रावल करणार होते. पण आता ती ऋषीकडे आली. ' ओ माय गाॅड' सिनेमाचं दिग्दर्शनही उमेश शुक्ला यांनी केलं होतं. आता हा सिनेमाही एका गुजराती नाटकावर आहे.

सिनेमात बिग बी 102 वर्षांचे असतील, तर त्यांचा मुलगा बाबू असेल ऋषी कपूर. दोघांनी मिळून नसीब, अमर अकबर अँथनी, कभी कभी हे सिनेमे केले होते. शशी कपूरच्या अजुबामध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगते, हे प्रेक्षकांना माहीत आहे.

आता वडील-मुलाची ही जुगलबंदी कशी होतेय, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 03:23 PM IST

ताज्या बातम्या