'गुंडागर्दी'नं लोकांचं प्रेम मिळत नाही, ऋषी कपूर राहुल गांधींवर भडकले

'गुंडागर्दी'नं लोकांचं प्रेम मिळत नाही, ऋषी कपूर राहुल गांधींवर भडकले

कॅलिफोर्नियात राहुल गांधींनी घराणेशाहीवर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, ' भारत घराणेशाहीवरच चालतो, फक्त राजकारणात नाही तर बिझनेस, बाॅलिवूडमध्येही असंच आहे.', यावर अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवर टीका केलीय. त्यांना प्रचंड राग आलाय.

  • Share this:

13 सप्टेंबर : कॅलिफोर्नियात राहुल गांधींनी घराणेशाहीवर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, ' भारत घराणेशाहीवरच चालतो, फक्त राजकारणात नाही तर बिझनेस, बाॅलिवूडमध्येही असंच आहे.', यावर अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवर टीका केलीय. त्यांना प्रचंड राग आलाय.

ऋषी कपूर यांनी तीन ट्विटस् केलेत.  एका ट्विटमध्ये ते म्हणतात, ' राहुल गांधी, भारतात सिनेमाला 106 वर्ष झालीयत. त्यातल्या 90 वर्षाचं योगदान कपूर कुटुंबाचंच आहे.'

दुसऱ्या ट्विटसमध्ये ते लिहितात, ' देवाच्या कृपेनं आता आमची चौथी पिढीही आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, रणबीर कपूर.'

दुसऱ्या ट्विटनंतर बारा मिनिटांनीच त्यांनी तिसरं ट्विट केलं. त्यात ते म्हणतात, ' घराणेशाहीवर बोलूच नका. लोकांचं प्रेम, सन्मान मिळण्यासाठी मेहनत करावी लागते. जबरदस्ती किंवा गुंडागर्दीनं काही मिळत नाही.'

ऋषी कपूर ट्विटरवर नेहमीच आपली परखड मतं मांडत असतात. त्यांना राग आला की ते कुणालाच सोडत नाही. राहुल गांधीही त्याला अपवाद ठरले नाहीत.

First Published: Sep 13, 2017 06:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading