Home /News /entertainment /

दीपिका आणि सोनमच्या वक्तव्यावर भडकले होते ऋषी कपूर, असा घेतला होता 'क्लास'

दीपिका आणि सोनमच्या वक्तव्यावर भडकले होते ऋषी कपूर, असा घेतला होता 'क्लास'

ऋषी कपूर अभिनयाबरोबरच त्यांच्या निर्भिड वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असत

    मुंबई, 5 मे : दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) जितके आपल्या कामासाठी प्रसिद्ध होते तितकेच ते आपल्या विविध विधानांसाठीही चर्चिले जात होते. त्याच्या विविध वक्तव्यांमुळे ते मीडियामध्ये कायम चर्चेत असतं. एकदा तर ते प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukon) आणि सोनम कपूरवर (Sonam Kapoor) इतके चिडले होते की त्यांनी त्यांच्या करिअर आणि क्लासवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. खरं तर या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांचा मुलगा रणबीर कपूरवर केलेल्या प्रतिक्रियेमुळे चिडले होते. हे सर्व प्रकरण 2010 सालचे आहे. तेव्हा दीपिका आणि सोनम या दोघी करन जोहर याच्या टॉक शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये करनने दीपिकाला विचारलं की तू रणबीर कपूरला गिफ्टमध्ये काय देऊ इच्छिते. यावर दीपिका म्हणाली, मी रणबीरला एक कॉंडमचं पाकीट देऊ इच्छिते, कारण तो याचा उपयोग जास्त करतो. सोबतच ती असंही म्हणाली की रणबीरला एका कॉंडम कंपनीची जाहीरात करायला हवी. तेव्हाच सोनम कपूर ही रणबीरविषय म्हणाली होती की, तो माझा चांगला मित्र आहे. मात्र तो चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही हे मला माहीत नाही. यानंतर दीपिकाने सोनमला धन्यवाद दिले. या दोन्ही अभिनेत्रींकडून मुलाबद्दल अपशब्द ऐकल्यानंतर ऋषी कपूर भडकले होते. एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते की अशा गोष्टी त्यांचा क्लास दर्शवते. अशा गोष्टींपेक्षा त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला हवे. हे वाचा -ब्रिटनमध्ये दाढी असलेल्या डॉक्टरांना का करू दिली जात नाहीये रुग्णसेवा? 3 भारतीय फोटो जर्नालिस्टनी या काश्मीरच्या फोटोंसाठी जिंकला पुलित्झर पुरस्कार
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Rishi kapoor, Sonam Kapoor

    पुढील बातम्या