ऋषी कपूर यांना सरप्राइझ द्यायला न्यूयॉर्कला पोहचला 'हा' बालमित्र, नीतू कपूरनी शेअर केला फोटो

ऋषी कपूर यांना सरप्राइझ द्यायला न्यूयॉर्कला पोहचला 'हा' बालमित्र, नीतू कपूरनी शेअर केला फोटो

ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्यानंतर बोमन इराणी यांनी भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 16 मे : 'स्टूडंट ऑफ द इयर' अणि 'हाऊसफुल 2' या सिनेमात एकत्र काम करणारे अभिनेते बोमन इराणी आणि ऋषी कपूर त्यांच्या बॉलिवूडमधील मैत्रीसाठी ओळखले जातात. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की ऋषी कपूर आणि बोमन इराणी हे दोघं एकमेकांचे बालपणापासूनचे मित्र आहेत. सध्या ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असून त्यानंतरच्या उपचारांसाठी अद्याप न्यूयॉर्कमध्ये आहेत. नुकतीच बोमन यांनी न्यूयॉर्कला जाऊन आपल्या मित्राची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा एक किस्सा बोमन यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्यानंतर बोमन इराणी यांनी त्यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्या भेटीत काय घडलं हे या पोस्ट मध्ये लिहिलं आहे. बोमन इराणी लिहितात, ऋषीजींनी मला विचारलं, 'तु पुन्हा न्यूयॉर्कमध्ये कधी येणार आहेस.' 'कदाचित या वर्षाच्या शेवटी' मी म्हणालो. मी तारखांचा विचार करत होतो. तेवढ्यात ऋषी म्हणाले, 'ऐक... आपण मुंबईमध्येच भेटू' त्यांचं हे स्पीरिट पाहून मी अवाक झालो. बोमन इराणी पुढे लिहितात, 'माझे बालपणीचे मित्र ऋषी कपूर आणि नीतूजी यांना भेटून खूप मजा आली. तुम्हा दोघांनीही खूप प्रेम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.'

ऋषी कपूर आणि बोमन इराणी यांच्या भेटीच्या आधी बर्थ डे बॉय विकी कौशलनंही ऋषी कपूर यांची भेट घेतली. यावेळीचा फोटो विकीनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोला विकीनं, 'तुमच्या एवढा जोश कोणाकडेच नाही. तुम्ही खूप खंबीर आहात सर, धन्यवाद, तुमचा बहुमुल्य वेळ दिल्याबद्दल ऋषी सर आणि नीतू मॅम.' असं कॅप्शन दिलं होतं. तसेच नीतू यांनीही विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्या सोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बोमन इराणी आणि विकी कौशलच्या अगोदर, आमिर खान, प्रियांका चोप्रा जोनस, दीपिका पदुकोण, अनुपम खेर यांनीही ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर लवकरच भारतात परततील असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं मात्र ते भारतात कधी येणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

First published: May 16, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading