ऋषी कपूर यांनी पाहिला तब्बल 27 लाखांचा बूट, दिली भन्नाट प्रतिक्रिया

ऋषी कपूर यांनी पाहिला तब्बल 27 लाखांचा बूट, दिली भन्नाट प्रतिक्रिया

Rishi Kapoor | Ranbir Kapoor | Risdhi Kapoor Tweet | ऋषी कपूर यांनी नुकतीच न्यूयॉर्कमधील एक स्नीकर शॉपला भेट दिली आणि तिथला अनुभव त्यांनी ट्वीटरवरून शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर पोस्ट कॅन्सर ट्रिटमेंट घेत आहेत. दरम्यान ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्यांनी नुकतच एक ट्वीट केलं ज्यावर युजर्सच्या अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया पाहयला मिळत आहेत. ऋषी कपूर यांनी नुकतीच न्यूयॉर्कमधील एक स्नीकर शॉपला भेट दिली आणि तिथला अनुभव त्यांनी ट्वीटरवरून शेअर केला.

विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी

ऋषी कपूर यांनी न्यूयॉर्कमधील ब्रँडेड स्नीकर स्टोरला भेट दिली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या बूटांच्या किंमती पाहून ते अवाक झाले. ट्विटरवरून त्यांनी हा आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला. त्यांनी लिहिलं,  ‘न्यूयॉर्कमधील सर्वात मोठं स्नीकर स्टोर. या ठिकाणी मी 12 हजारा पेक्षा जास्त स्टाइल्स आणि मॉडेल्स पाहिले. त्यांची किंमत ऐकून मी अवाक झालो.  या ठिकाणी स्नीकर्सची किंमत USD 40,000 (Rs 27,56,900), USD 27,000 (Rs 18,60,907), USD 25,000 (Rs 17,23,062) आणि USD 20,000 (Rs 13,78,450) पर्यंत आहे. इथल्या जास्तीत जास्त बूटांची किंमत USD 5,000 (Rs 3,44,732) एवढी किंवा त्याहून जास्त आहे.’

VIDEO : ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान टायगर-दिशा पुन्हा दिसले एकत्र

दुसऱ्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर यांनी काही स्नीकर्सचे फोटो शेअर केले. यासोबत त्यांनी एक गंमतीदार कॅप्शन लिहिलं, ‘या स्नीकरची किंमत पाहा. हा मला त्या गोष्टीची आठवण करून देतो, बूट सोन्याचा असो वा चांदीचा, घालणार तर पायातच’

स्वप्नील जोशीची गाडी जोरात! अवघ्या दोन आठवड्यात कमावले इतके कोटी

ऋषी कपूर यांच्या या ट्वीट नंतर नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एका युजरनं लिहिलं, हे सर्व इथल्या चौकांमध्ये 1000 आणि 500 रुपयांमध्य मिळतात. तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, माझी एवढी सॅलरीही नाही. ऋषी कपूर यांच्या या ट्वीटनंतर अनेकांचं महागडे स्नीकर्स खरेदी न करू शकण्याचं दुःख दिसलं.

कपूर फॅमिलीमध्ये मलायकाची एंट्री, संजय कपूरच्या पत्नीनं शेअर केला फोटो

ऋषी कपूर कॅन्सरची ट्रीटमेंट संपवून लवकरच काही महिन्याच भारतात परतणार आहेत. दरम्यान ऋषी कपूर यांच्या आगामी सिनेमाची घोषणाही झाली आहे. ते 'झूठा कहीं का' या सिनेमात दिसणार आहेत. याचं फर्स्ट पोस्टर रिलीज झालं असून हा सिनेमा 19 जुलैला रिलीज होणार आहे.

==============================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या