लता दीदींसोबतचा हा फोटो शेअर करताना ऋषी कपूर यांनी लिहिलं, नमस्कार लता जी. तुमच्या आशीर्वादानं मला आपला मी 3 महिन्याचा असतानाचा फोटो सापडला. तुमचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच राहिला आहे. धन्यवाद. मी हा फोटो ट्विटरवर शेअर करुन सर्वांना सांगू इच्छितो की हा फोटो माझ्यासाठी किती मौल्यवान आहे. ऋषी कपूर यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सारा अली खान की आणखी कोण? हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही व्हाल हैराणनमस्ते लता जी। आपके आशीर्वाद से देखिए मुझे अपनी दो या तीन महीने वाली अपनी पिक्चर मिल गई। सदा आपका आशीर्वाद रहा है मुझ पर। बहुत बहुत धानियवाद। क्या मैं दुनिया को बता सकता हूँ ये तस्वीर ट्विटर पे डाल के?ये एक बेशक़ीमती पिक्चर है मेरे लिए! pic.twitter.com/qbrCZYBBeR
— Rishi Kapoor (@chintskap) January 28, 2020
नुकतीच ऋषी कपूर यांनी घोषणा केली होती की ते लवकरच दीपिका पदुकोणसोबत द इंटर्न या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा द इंटर्नचा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोण करत आहे. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर इम्रान हाश्मीसोबत द बॉडी या सिनेमात दिसले होते. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. आयुष्मानला ‘गे’ भूमिकेत पाहिल्यावर मुलाची धक्कादायक प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rishi kapoor