Wonderful Sara! सारा अली खानच्या एअरपोर्ट लुकचं ऋषी कपूर यांनी केलं तोंडभर कौतुक, कारण...

Wonderful Sara! सारा अली खानच्या एअरपोर्ट लुकचं ऋषी कपूर यांनी केलं तोंडभर कौतुक, कारण...

साराचा एक एअरपोर्ट व्हिडिओ नव्यानं व्हायरल होत आहे. ज्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : अभिनेत्री सारा अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पणातच एका मागोमाग एक दोन हिट सिनेमे दिले. याशिवाय सोशल मीडियावरही तिचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ती कुठेही गेली तरीही कॅमेरा तिची पाठ सोडत नाही आणि सारा सुद्धा नेहमीच सर्वांना हसून ‘नमस्ते’ करताना दिसते. त्यामुळे सध्या तिचा हाच अंदाज तिची ओळख बनला आहे. याशिवाय मागच्या काही दिवसांपासून ती कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. हे दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पण आता साराचा एक एअरपोर्ट व्हिडिओ नव्यानं व्हायरल होत आहे.

सारा नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्या लगेज बॅग्स स्वतःच घेऊन जाताना दिसत आहे. सारा एकटी अशी स्टार किड आहे जी स्वतःचं सामान स्वतःच घेऊन जाताना दिसत आहे. एवढंच नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारही आपलं सामान कधीच स्वतः घेऊन जाताना दिसत नाहीत. त्यामुळे सध्या तिचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे आणि आता यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचीही भर पडली आहे. ऋषी कपूर यांनी सारासाठी खास ट्वीट करत तिचं कौतुक केलं आहे.

प्रियांका चोप्राच्या पतीला जवळपास 46 कोटींचं घर विकावं लागलं, कारण...

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘वंडरफुल सारा. तु सर्वांसमोर एक उदाहरण सेट केलंस की एअरपोर्टवर कसं वागावं. स्वतःचं सामान स्वतः घेऊन जाण्यात वाईट असं काहीच नाही. रिसिव्ह करण्यासाठी कोणी नाही, कोणतेही डार्क ग्लासेस नाही आणि काही खास असा एअरपोर्ट लुक नाही. तु कोणतीही भीती न बाळगता कॉन्फिडन्स दाखवलास. Atta girl!’

'तु खरंच लायक आहेस का?' वादग्रस्त ट्वीटवरून आतिफ असलमला नेटकऱ्यांनी झापलं

सारा मागच्या काही काळापासून सारा आणि कार्तिक यांच्या अफेअर्सच्या चर्चा आहेत. सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण आता कार्तिक आणि सारा त्यांच्या नात्याला पुढे नेण्याविषयीचा विचार करत आहेत आणि कार्तिकनं याची तयारीही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका-अर्जुन देतायत कपल गोल्स, एअरपोर्ट लुक झाला व्हायरल

वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर कार्तिक आणि सारा इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

==========================================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

Published by: Megha Jethe
First published: August 8, 2019, 2:08 PM IST

ताज्या बातम्या