अचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक?

अचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक?

नुकतंच ऋषी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आपण भट परिवारातील बहुतांश चांगल्या लोकांसोबत काम केल्याचं लिहिलं.

  • Share this:

२४ मे : ट्विटरवर कायम सक्रिय असलेल्या ऋषी कपूर यांच्या नव्या ट्विटमुळे भलतीच चर्चा सुरू झालीय. नुकतंच ऋषी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आपण भट परिवारातील बहुतांश चांगल्या लोकांसोबत काम केल्याचं लिहिलं.यात महेश भट्ट, मुकेश भट्ट, रोबिन भट्ट, पूर्णिमा जी, पूजा भट्ट, आलिया भट्ट या सगळ्यांसोबत काम केल्याचं सांगितलं.

मात्र अचानक ऋषी यांनी भट्ट कुटुंबाचे आभार मानल्याने त्याचा संबंध आलिया आणि रणबीरच्या फुलत असलेल्या नात्याशी तर नाही ना असा तर्क काही नेटीझन्सनी लावला.आता ऋषी याबाबत काय स्पष्टीकरण देतात ते पहायचं.

सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलिया एकमेकांच्या हातात हात घालून आले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता ऋषी कपूरच्या ट्विटनं त्यात भरच पडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2018 06:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading