S M L

'माझ्या काळात तू का आली नाहीस' ; ऋषी कपूर प्रिया वारियरवर फिदा

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूरदेखील प्रिया वारियरवर फिदा झाले आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियाचं कौतुक केलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 18, 2018 08:23 AM IST

'माझ्या काळात तू का आली नाहीस' ; ऋषी कपूर प्रिया वारियरवर फिदा

18 फेब्रुवारी : प्रिया वारियरची लोकप्रियता फक्त भारतातच नव्हे तर जभरात पसरली आहे. तीची भूरळ बॉलिवूडलाही पडली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूरदेखील प्रिया वारियरवर फिदा झाले आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियाचं कौतुक केलं आहे.

'मी प्रियाच्या स्टारडमविषयी एक भविष्यवाणी करतो. ती खुपच सुंदर पद्धतीने एक्स्प्रेशन देते आणि नखरेबाज असतानाही ती इनोसेंट दिसते.' असं ऋषी कपूर यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.

ऋषीजी एवढ्यावरच न थांबता 'माझ्या काळात तू का आली नाहीस!' असा प्रश्न देखील त्यांनी प्रियाला विचारला आहे. रातोरात स्टार झालेल्या प्रियाचे आता चिंटू कपूर देखील फॅन झालेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 08:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close