ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही मुलगा रणबीर

ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही मुलगा रणबीर

ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांच्यात मुलगा आणि वडिलांपेक्षा मैत्रीचं नातं होतं. मात्र त्यांची शेवटची इच्छा रणबीर पूर्ण करु शकला नाही.

  • Share this:

मुंबई, 1 मे : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांचं काल 30 एप्रिलला मुंबईमध्ये निधन झालं. ऋषी कपूर मागच्या दोन वर्षांपासून कॅन्सरनं ग्रस्त होते. 2019 च्या अखेरीस ते अमेरिकेतून उपचार घेऊन भारतात परतले होते. त्यानंतर सोशल मीडियावरही बरेच सक्रिय होते. त्यांनी काही सिनेमा सुद्धा साईन केले होतं. त्याची तब्येत सुद्धा सुधारत होती. मात्र बुधवारी रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि अखेर गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी व्यक्त केलेली त्यांची इच्छा त्यांचा मुलगा रणबीर पूर्ण करु शकला नाही.

ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांच्यात मुलगा आणि वडिलांपेक्षा मैत्रीचं नातं होतं. ज्यावेळी ते न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यावेळी त्यांनी रणबीरला आपल्या मनातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. न्यूयॉर्कमधून भारतात परतल्यावर सुद्धा ते मोकळेपणानं आपल्या फॅमिलीबद्दल बोलताना दिसले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एक खास इच्छा व्यक्त केली होती जी आपल्या मुलानं पूर्ण करावी असं त्यांना वाटत होतं.

बिपाशा बासूनं शेअर केले लग्नातले पतीसोबतचे रोमँटिक क्षण, पाहा UNSEEN VIDEO

 

View this post on Instagram

 

Your family is your whole world ❤️ so so many LOVES in these beautiful moments

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर यांना आपल्या मुलाच्या लग्नाबाबत उत्सुकता होती. त्यांना आपल्या मुलाचं लग्न झालेलं पाहायचं होतं. या मुलाखतीत ते म्हणाले होते, मलाही आता वाटतं की रणबीरनं आता संसार थाटावा. त्याची मुलं असावी. त्यानं आता लवकर लग्न करावी एवढीच माझी इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यांची ही इच्छा रणबीर पूर्ण करू शकला नाही.

'मी काही गमावलं नाही तर...' इरफानच्या निधनानंतर पत्नीची इमोशनल पोस्ट व्हायरल

ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत असताना रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या नात्याच्या चर्चा सुद्धा झाल्या अनेकदा त्यांच्या लग्नाच्या अफवा सुद्धा समोर आल्या. मात्र कपूर किंवा भट फॅमिलीकडून त्यांच्या लग्नाची कोणतीही ऑफिशिअल घोषणा केली गेली नाही. मात्र कपूर फॅमिलीच्या कोणत्याही फंक्शनमध्ये आलिया आवर्जुन उपस्थित असलेली दिसली.

(संपादन- मेघा जेठे.)

अनुष्का-विराटनं फॅमिलीपासून लपवली होती लव्हस्टोरी, वाचा काय होतं कारण

First Published: May 1, 2020 01:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading