अमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का?

अमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का?

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या उपचार करून घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झालेत. वयाची पन्नाशी उलटल्याने आणि सततच्या शूटिंगच्या धामधुमीमुळे काही त्रास होत असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याचं त्यांनी ट्विट करून जाहीर केलंय.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : कृष्णा कपूर यांच्या निधनानं कपूर कुटुंबावर मोठं दु:ख कोसळलंय. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांची आई गेली. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव, रीमा आणि रितू ही पाच मुलं आहेत. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर पोचू शकतील की नाही?

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या उपचार करून घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झालेत. वयाची पन्नाशी उलटल्याने आणि सततच्या शूटिंगच्या धामधुमीमुळे काही त्रास होत असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याचं त्यांनी ट्विट करून जाहीर केलंय. मात्र त्यांना नक्की काय झालंय याबद्दल त्यांनी या पोस्टमध्ये काहीही लिहिलेलं नाही. असं असलं तरीही आपल्या तब्येतीबाबत काहीही चर्चा करू नका. माझ्या तब्येतीबद्दल आल्यावर मी स्वतः तुम्हाला सांगेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

कृष्णा कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अधिक खालावली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई आजारी असतानाही त्यांना अमेरिकेला तातडीनं जावं लागलं. त्यामुळे अनेक फॅन्सना काळजी वाटतेय.

कृष्णा कपूर यांचं १९४६मध्ये राज कपूर यांच्याशी लग्न झालं. करिष्मा, करिना, रणबीर आणि रिद्धिमा कपूरच्या त्या आजी आहेत. वयाच्या ८७ वर्षीही त्या फार सक्रीय होत्या. त्या कौटुंबिक पार्टी, सिनेमांच्या प्रीमिअरला अनेकदा आवर्जून उपस्थित राहायच्या. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबिय पॅरिसमध्ये उपस्थित होते.

आय.जी.ची मुलगी होती कृष्णा, एसपीच्या बंगल्यात राज कपूरसह घेतले सात फेरे

First published: October 1, 2018, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading