ऋषी कपूर भारतात परतणार, चाहत्यांना उद्या मिळणार मोठी बातमी

ऋषी त्यांच्या आजारावर उपचार घेत होते तर मुंबईत त्यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. आईच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 03:32 PM IST

ऋषी कपूर भारतात परतणार, चाहत्यांना उद्या मिळणार मोठी बातमी

अनेक दिवसांपासून ऋषी कपूर या महिन्यात भारतात परतणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता ऋषी अनंत चतुर्थीच्या दोन दिवसआधी अर्थात 10 सप्टेंबरला मुंबईत परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऋषी गेल्यावर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते.

अखेर वर्षभराने ते आता भारतात परतत आहेत. एकीकडे ऋषी त्यांच्या आजारावर उपचार घेत होते तर मुंबईत त्यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. आईच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते.

याशिवाय काही दिवसांनी आरके स्टूडिओही विकावा लागला. यावेळी ते न्यूयॉर्कमध्येच होते.

गेल्या एका वर्षात ऋषी यांनी अनेक ट्वीट केले. यात त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजल्याचं सतत दिसत होतं. प्रत्येक ट्वीटमध्ये त्यांनी नीतू यांचं भरभरून कौतुक केलं.

ऋषी म्हणाले होते की, 'एवढ्या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे.'

Loading...

याआधी रणधीर कपूर यांनीही ऋषी हे 10 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचं सांगितलं होतं. मुंबईत गणपती विसर्जनाआधी ते येणार असले तरी आरके स्टुडिओमध्ये यंदापासून गणपतीची स्थापना करण्यात येणार नाही.

अखेर ते भारतात परतत असल्यामुळे संपूर्ण कपूर कुटुंबासोबतच त्यांचे चाहतेही कमालीचे आनंदी आहेत. भारतात परतल्यावर लगेच त्यांना कामाला सुरुवात करायची आहे असं त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे दोन मोठे प्रोजेक्टही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...