मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नीतू कपूर कशा पडल्या ऋषी कपूर यांच्या प्रेमात? पाहा अभिनेत्रीची अनोखी लव्हस्टोरी

नीतू कपूर कशा पडल्या ऋषी कपूर यांच्या प्रेमात? पाहा अभिनेत्रीची अनोखी लव्हस्टोरी

ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र; मैत्रीचं रुपांतर कसं झालं प्रेमात?

ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र; मैत्रीचं रुपांतर कसं झालं प्रेमात?

ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र; मैत्रीचं रुपांतर कसं झालं प्रेमात?

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 जुलै: नीतू कपूर (Neetu Kapoor) या कधीकाळी बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्री म्हणून ओलखल्या जायच्या. ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘दीवार’, ‘याराना’, ‘खेल खेल मै’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. (Neetu Kapoor birthday) 63 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी त्यांच्या जुन्या ठवणींना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान त्यांची एक आठवण सध्या प्रचंड चर्चेत आहे. (Rishi Kapoor and Neetu Kapoor love story) नीतू कपूर या दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रेयसीसाठी पत्र लिहायच्या.

दिलीप कुमार यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण; सायरा बानो यांनी ती गोष्ट करण्यास दिला नकार

नीतू कपूर यांनी जनसत्ताला दिलेल्या मुलाखतीत या लव्हलेटरचा किस्सा सांगितला होता. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यामुळे दोघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली होती. हे दोघंही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट शेअर करत होते. यामध्येच ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडविषयीदेखील नीतू कपूर यांना माहित होतं. विशेष म्हणजे अनेक वेळा ऋषी कपूर यांना गर्लफ्रेंडला प्रेमपत्र लिहिण्यासाठी नीतू कपूर यांनी मदत केली होती.

‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

त्यावेळी ऋषी कपूर यास्मीन मेहता नामक अभिनेत्रीला डेट करत होते. त्याचवेळी डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या अफेअरविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. हा दुरावा दूर करण्यासाठी नीतू कपूर यांनी यास्मीनला ऋषी कपूर यांच्या वतीनं पत्र लिहिलं होतं. यामुळे ऋषी कपूर आणि नीतू यांच्यामध्ये अधिक जवळीक निर्माण झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. आणि नंतर दोघांनी लग्न केलं.

First published:

Tags: Birthday celebration, Bollywood actress, Love story