मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /400 कोटींच्या कमाईनंतर अखेर 'कांतारा 2'ची घोषणा! पण सिनेमात मोठा ट्विस्ट; निर्मात्यांचा खुलासा

400 कोटींच्या कमाईनंतर अखेर 'कांतारा 2'ची घोषणा! पण सिनेमात मोठा ट्विस्ट; निर्मात्यांचा खुलासा

kantara 2

kantara 2

ऋषभ शेट्टी सध्या कांताराच्या स्क्रिप्टिंगवर काम करतोय. पुढच्या काही महिन्यात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात होणार.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी: 2022चा सर्वाधिक हिट झालेला सिनेमा म्हणजे कांतारा. सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एक नाही तर अनेकवेळा प्रेक्षक कांतारा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले. या सिनेमाचा प्रीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कांतारा 2 ची नुकतीच घोषणा झाली आहे. होम्बले फिल्स या कांताराच्या प्रोडक्शन हाऊसनं ही माहिती दिली आहे. कांतारा 2मध्येही अभिनेता ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे त्याचप्रमाणे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील ऋषभचं पेलणार आहे. ऋषभ शेट्टी कांताराचा सिक्वेल नाही प्रिक्वेल आणणार आहे. म्हणजेच सिनेमात पुढची कहाणी दाखवण्यात येणार नाहीये. तर सिनेमात दाखवण्यात आलेल्या लोककथेचा आणखी विस्तार दाखवण्यात येणार आहे.

कांताराच्या प्रोडक्शन हाऊसचे प्रोड्यूसर विजय किरागंदूर यांनी म्हटलं आहे की, ऋषभ शेट्टी सध्या कांताराच्या स्क्रिप्टिंगवर काम करतोय. पुढच्या काही महिन्यात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात होणार आहे. कांतारा 2च्या बजेटबद्दल विचारला असता त्यांनी सांगितंल, कातांरा 2 चं बजेट हे कांतारापेक्षा अधिक असेल. होम्बले स्टुडिओनं काही दिवसांआधीच घोषणा केली होती की येणाऱ्या पाच वर्षात येणाऱ्या सिनेमा आणि वेब सीरिजवर 30 अरब रुपये लावणार आहेत. याचाच अर्थ कांतारा 2 हा आतार्यंतचा सर्वात बिग बजेट सिनेमा असू शकतो.

हेही वाचा - Rishab Shetty kantara : पाण्याच्या बाटल्या विकणारा ऋषभ शेट्टी असा बनला सुपरस्टार

अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या सिनेमावर रिसर्च करतोय. पुढची कथा लिहिण्यासाठी तो कर्नाटकच्या किनारी जंगलात गेला होता. संपूर्ण टीम कांताराच्या प्रीक्वलच्या तयारीत आहेत. सिनेमाचा काही भाग हा पावसाळ्यात शूट करायचा आहे त्यामुळे टीम पावसाळ्याची वाट पाहत आहेत.  प्रोड्यूसरनं म्हटलं आहे की, सिनेमा पुढील वर्षी एप्रिल मे महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. पॅन इंडिया देखील सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे.

कांतारा 2मध्ये काही नवे कलाकार दिसतील अशी माहिती  प्रोड्यूसरनं दिली आहे. कलाकार जरी बदलले सिनेमा कांतारा स्टाइलनेच बनवण्याचा प्रयत्न असणार आहे, असंही ते म्हणाले. कांतारा हा सिनेमा सप्टेंबर  2022ला पहिल्यांदा कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. सिनेमा कन्नड बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सिनेमा हिंदीसह इतर भाषेत प्रदर्शित करण्यात आला. आता कांतारा 2ची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत.

First published:

Tags: South actress, South film, South indian actor