News18 Lokmat

आर्ची घेऊन येतेय नवी लव्ह स्टोरी!

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2018 11:43 AM IST

आर्ची घेऊन येतेय नवी लव्ह स्टोरी!

मुंबई, 01 नोव्हेंबर : सैराट सिनेमामुळे आर्ची-परशा प्रसिद्ध झाले. सैराट एक मैलाचा दगड ठरला होता. मराठीतला हा रेकाॅर्डब्रेक सिनेमा. आर्ची म्हणजेच रिंकू आता नवी प्रेमकहाणी घेऊन येतेय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे. त्याचं पोस्टर रिलीज झालं.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदनं यापूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींची गराडा अन् त्यात रिंकूच्या असलेला दिसण्यातला साज अाणि नजरेतील करारीपणा हे एक्स्प्रेशन विलक्षण  आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

Loading...

'कागरची व्याख्या अधिक स्पष्ट करायला, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन अजून फुलवायला, एकमेकांमधलं नातं घट्ट करायला आणि नजरेतल्या भावना अलगद अनुभवण्यासाठी आम्ही 'कागर' घेऊन येत आहोत,' असं दिग्दर्शक मकरंदनं सांगितलं.

VIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...