रिंकू म्हणते, ‘एकदा जीव लावला की तो मरेपर्यंत.. अगदी परमनंट लव्ह’

रिंकू म्हणते, ‘एकदा जीव लावला की तो मरेपर्यंत.. अगदी परमनंट लव्ह’

प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसं वागावं त्याचे धडे देतानाही दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, ०१ एप्रिल- 'सैराट' सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचा आगामी कागर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. अवघ्या काही तासांमध्ये हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १ मिनिट २१ सेकंदांच्या या टीझरमध्ये रिंकूचं राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतरच्या बदलाची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसं वागावं त्याचे धडे देतानाही दिसत आहे.

दोघांचं प्रेम फुलत असतानाच असं काही होतं की रिंकूच्या प्रियकराचा मृत्यू होतो आणि त्यानंतर रिंकूचा राजकीय प्रवास टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. सैराटप्रमाणे या सिनेमातही रिंकूच्या आवाजाचा तोड बाज असल्यामुळे वेगळ्या विषयावरील सैराटचाच टीझर तर आपण पाहत नाही ना असा भास प्रेक्षकांना होतो. पण प्रेक्षकांना गुंतवणून ठेवण्यात हा टीझर यशस्वी झाला आहे. टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.


कागर सिनेमाची घोषणा झाली त्या दिवसापासून हा सिनेमा चर्चेचा विषय ठरत आहे. सैराट सिनेमानंतरचा रिंकूचा हा दुसरा सिनेमा असल्यामुळे या सिनेमाच्या कथेबद्दल अनेकांमध्येच कुतूहल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाची दोन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली होती. यातला रिंकूचा लुक तुफान व्हायरल झाला होता. यावरूनच रिंकूची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही असंच म्हणावं लागेल.

पोस्टरवर तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर' या ओळीतून रिंकू राजगुरूची ओळख करून देण्यात आली आहे. रिंकूचं हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अजून वाढली.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांनी ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. आता ‘कागर’च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे.


पोस्टरमध्ये एका बाजूला मिरवणूक, गुलाल आणि राजकीय नेत्यांप्रमाणे नमस्कार करताचे रिंकूचे पोस्टर दिसते. यावरून कागर हा सिनेमा नायिकाप्रधान असून रिंकूने यात राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. याआधीही कागरचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यात एका पडद्याआड उभी असलेली रिंकू गहन विचार करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये पडदा, त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गराडा अन् त्यात रिंकूच्या दिसण्यातला साज... नजरेतील करारीपणा हे एक्स्प्रेशन विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही.


या पोस्टरमुळे सिनेमाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे. याआधी हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र रिंकूची १२ वी ची परीक्षा असल्यामुळे सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या