'तुला आमचा फुल्ल सपोर्ट', असं झालं तरी काय की रिंकुला चाहत्यांकडून मिळाली ही प्रतिक्रिया
'तुला आमचा फुल्ल सपोर्ट', असं झालं तरी काय की रिंकुला चाहत्यांकडून मिळाली ही प्रतिक्रिया
नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने असं कॅप्शन दिले आहे की, 'जेवढी तुम्हाला तुमची गरज असते तेवढी कुणालाही तुमची गरज नसते'.
मुंबई, 24 जून : 'सैराट'च्या घवघवीत यशानंतर रिंकू राजगुरू या छोट्या शहरातून आलेल्या अभिनेत्रीने मागे वळून पाहिलच नाही. ती वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, सीरिज करून तिचं अभिनय कौशल्य दाखवत आहे. मात्र रिंकूची विशेष चर्चा होते ती म्हणजे तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर! सैराटमधून पदार्पण केलेली रिंकू आणि आता इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करणारी रिंकू यामध्ये बराच फरक आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील सेल्फी, बोल्ड अंदाजातील फोटो, लॉकडाऊनमध्ये शूट केलेले व्हिडीओ यामुळे रिंकू कायम चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती इन्स्टाग्रावर विशेष सक्रीय देखील आहे.
दरम्यान नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करणाऱ्या रिंकूने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने असं कॅप्शन दिले आहे की, 'जेवढी तुम्हाला तुमची गरज असते तेवढी कुणालाही तुमची गरज नसते'.
(हे वाचा-'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहित आहे का? बिग बींनी सांगितलं नाव)
तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी काही युजरनी रिंकुला असं म्हटलं आहे की, 'आमचा तुला फुल्ल सपोर्ट आहे'. रिंकूच्या या फोटोवर अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील हृदयाची स्माइली टाकत फोटोचं कौतुक केलं आहे.
या फोटोमध्ये प्रचंड आत्मविश्वासामध्ये दिसणारी रिंकू सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा एक साडीतील व्हिडीओ देखील शेअर केला होता. या 20 सेकंदाच्या मराठमोळ्या अंदाजातील व्हिडीओचं देखील खूप कौतुक झालं होतं.
काही दिवसांपूर्वी रिंकू 'हंड्रेड' या ही हिंदी वेबसीरिजमध्ये दिसली होती. त्यामध्ये देखील रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या सीरिजमध्ये 'नेत्रा पाटील' ही भूमिका साकारली आहे. यामध्ये रिंकूने लारा दत्ताबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.