रिंकूच्या हातात खेळणारं बाळ आहे तरी कोण? VIDEO मुळे सोशल मीडियावर धिंगाणा

रिंकूच्या हातात खेळणारं बाळ आहे तरी कोण? VIDEO मुळे सोशल मीडियावर धिंगाणा

तिच्या सगळ्या मराठमोळ्या आणि स्टाईलिश लूकला तिचे चाहते भरभरून प्रेम करतात. तिच्या फोटोंवर किंवा व्हिडिओवर प्रचंड लाईक आणि कमेंट्स असतात.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : 'सैराट' फेम आर्ची म्हणजे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावरही चाहत्यांची फेव्हरेट आहे. ती स्वत: सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहत चाहत्यांच्याही संपर्कात असते. ती नेहमी तिच्या हटके स्टाईलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमांवर पोस्ट करत असते. रिंकूच्या नव्या आणि दिलखेचक फोटोंमुळे ती कायम चर्चेतही असते.

तिच्या सगळ्या मराठमोळ्या आणि स्टाईलिश लूकला तिचे चाहते भरभरून प्रेम करतात. तिच्या फोटोंवर किंवा व्हिडिओवर प्रचंड लाईक आणि कमेंट्स असतात. असाच एक व्हिडिओ सध्या तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. तो म्हणजे रिंकूने एका लहान चिमुकल्यासोबत खेळतानाचा गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमधलं बाळ नेमकं कोणाचं आहे हे मात्र अद्याप समजू शकलं नसलं तरी चाहत्यांना या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. तर हे बाळ कोणाचं आहे असेही प्रश्न चाहत्यांनी कमेंट्समध्ये विचारले आहेत.

 

View this post on Instagram

 

Elegance is the only beauty that never fades.🌼

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

दरम्यान, रिंकू राजगुरू ही 'मेकअप' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांआधी मेकअप सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. यात टीझरमध्ये रिंकूसोबत चिन्मय उद्गिरकरसुद्धा दिसत आहे. खरंतर या सिनेमात रिंकू काय भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी चाहत्यांना मात्र आता सिनेमाची प्रतिक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

Makeup 😊 @chinmayudgirkar

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2019 01:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading