मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आर्चे तू तर लयच ..' रिंकू राजगुरूचा गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ पाहून चाहते पडले प्रेमात!

'आर्चे तू तर लयच ..' रिंकू राजगुरूचा गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ पाहून चाहते पडले प्रेमात!

Rinku Mahadeo Rajguru

Rinku Mahadeo Rajguru

आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरूवात. यानिमित्त रिंकू राजगुरू खास तयार झाली आहे. तिचा एक सुंदर व्हिडिओ देखील तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च - सैराट सिनेमानं मराठी मनोरंजन विश्वाला रिंकू राजगुरू ही सुंदर अभिनेत्री मिळाली. या सिनेमात तिनं आर्चीची भूमिका साकारली होती. आर्चीची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठासून भरली आहे की, आजही रिंकूला सर्वजण आर्ची या नावानं ओळखतात. आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरूवात. यानिमित्त रिंकू राजगुरू खास तयार झाली आहे. तिचा एक सुंदर व्हिडिओ देखील तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

रिंकू राजगुरूनं नुकताच तिचा पिंक साडीतला व्हिडिओ शेअ र केला आहे. नाकात नथ आणि केसात गजरा..असा काहीसा पारंपरिक लूक रिंकूनं केला आहे. तिनं तिचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढीपाडव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ Wishing everyone a very happy gudi padwa ❤️❤️.

या व्हिडिओमध्ये मागे बहरला हा मधुमास..हे गाणं वाजत आहे. हे गाणं सध्या ट्रेंड करत आहे. अनेक अभिनेत्रींनी या गाण्यावर रील केली आहेत. रिंकूनं देखील या गाण्यावर तिच्या अंदाजात अदाकारी केली आहे. तिच्या याच अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून रिंकूच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

वाचा-मराठमोळ्या वंदना गुप्तेंनी 70 व्या वर्षी पुन्हा बांधली लग्नगाठ; समोर आले फोटो

एका चाहत्यानं म्हटलं आहे की, आर्चे तू तर लयच सुगरण दिसतेय......😍😍 तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, बाण नजरतला घेऊनी अवतरली सूंदरा😍❤️...अशा असंख्य कमेंट आर्चीच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. शिवाय अनेकांनी तिला गुढीपाडव्याच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

रिंकू सोशल मीडियावर अनेकदा साडीमधले फोटो पोस्ट करते. विशेष करून ती पिंक रंगाच्या साडीतील फोटो जास्ता पोस्त करताना दिसते. साडीत ती नेहमीच सुंदर दिसते. अनेकदा चाहते तिला साडीत पाहून तिला तू स्मिता पाटील यांच्यासारखी दिसतेस असं म्हणत तिच्या सुंदरतेचे कौतुक करताना दिसतात. आपल्याला साडी नेसायला खूप आवडते असं रिंकूने सांगितलं होतं. रिंकूचं हे साडी प्रेम अनेकदा सोशल मीडियावर दिसलं आहे.

आतापर्यंत अभिनेत्रीची चालत आलेली व्याख्या बदलून रिंकू राजगुरू सारखी अभिनेत्री जगासमोर उभी केली. सिनेमाच्या भरघोस यशानंतर आपण पाहिलंच की रिंकू राजगुरूचं किती कौतुक झालं. अवघ्या वयाच्या 16  व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रिंकूने आपली एक वेगळी ओळख या सिनेसृष्टीत केली.रिंकूनं मराठी मनोरंजन विश्वातच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment