नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

रिंकूला नाईट लाईफ या हॉट टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आल्यावर ‘नाईट लाइफ! ते काय असतं’ या तिच्या प्रतिप्रश्नानं सर्वच अवाक झाले.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : सैराटफेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या तिचा आगामी सिनेमा मेकअपच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या सिनेमात रिंकू पहिल्यांदाच चिन्मय उदगीरकरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दरम्यान सिनेमा प्रमोशनसाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत रिंकूला नाईट लाईफ या हॉट टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आल्यावर ‘नाईट लाइफ! ते काय असतं’ या तिनं केलेल्या निरागस प्रतिप्रश्नानं सर्वच अवाक झाले.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू ‘कागर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं बरंच कौतुकही झालं. त्यानंतर रिंकू आता मेकअप या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. या सिनेमात तिनं एका बोल्ड बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा प्रमोशन प्रेस कॉन्फरन्स एका पत्रकारानं रिंकूला  तुम्ही हल्ली सिनेमाच्या शुटिंगसाठी मुंबईत राहता. तिथल्या नाईट लाईफबद्दल काय सांगाल असा प्रश्न विचारला. त्यावर तिने चेहऱ्यावर प्रश्नार्थक हावभाव आणून ते काय असतं. असा उलट सवाल केला. त्यामुळे सर्वच जण अवाक झाले.

अक्षय कुमारनं 10 मिनिटात सिनेमाला दिला होकार, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

 

View this post on Instagram

 

Flaunting 💁‍♀️🌸

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

अखेर रिंकूचा सहकलाकार चिन्मय उदगीरकरनं याने तिला नाईटलाईफ म्हणजे काय हे समजावून सांगितलं. तेव्हा मग स्वत:ला वेळीच सावरत, ‘सॉरी नाईट लाईफ या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीये’ अशी सारवासारव केली. सिनेमात बोल्ड मुलीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूला नाईट लाईफ माहित नसल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण या निमित्तानंच कमी वयात ‘सैराट’ सिनेमामुळे लाईम लाईटमध्ये आलेल्या रिंकू राजगुरूचा निरागसपणा आणि फिल्मी कलाकारांचं जनरल नॉलेज हा विषय पुन्हा चर्चेला आलाय.

'तान्हाजी'नंतर अजय देवगण नव्या अवतारात, Maidaan First Look रिलीज

रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेकअप हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं गणेश पंडित यांनी केलं आहे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिकेत असणाऱ्या रिंकूचा हा सिनेमा रिलीजच्या आधीच चर्चेत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचं आसणार आहे.

कोणी 36 व्या वर्षी लग्न केलं तर कोणी 60 व्या वर्षी, नावं वाचून बसेल धक्का

First published: January 30, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या