...आणि आर्ची पाय घसरून पडली ?, व्हिडिओ व्हायरल

...आणि आर्ची पाय घसरून पडली ?, व्हिडिओ व्हायरल

  • Share this:

09 नोव्हेंबर : सैराटमध्ये एका गाण्यादरम्यान 'आर्ची'ज्या फांदीवर बसली होती ती तुटली त्याची चर्चा चांगलीच झाली होती. आता तर 'आर्ची' एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान पाय घसरून पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. मात्र, या व्हिडिओतली 'आर्ची' ही रिंकू राजगुरूच आहे या बद्दल अजून दुजोरा मिळालेला नाही.

जगाल याडं लावणाऱ्या सैराट चित्रपटातून आर्चीची व्यक्तिरेखा साकरणारी रिंकू राजगुरू अल्पवधीत आर्ची म्हणून लोकप्रिय घाली. अकलूजची रिंकू सर्वांना आर्ची म्हणून ओळखीची झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने दाक्षिणात्य सिनेमात एंट्री घेतली.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ दिसणारी आर्ची सेम रिंकू राजगुरू सारखीच दिसतेय. या सिनेमाचं शुटिंग एका नदीच्या किनाऱ्यालगत सुरू होतं. एका गाण्याचं हे शुटिंग होतं. 'आर्ची'ने जेव्हा गाण्यावर ठेका धरला तेव्हा तिचा पाय एका डबक्यात पडला आणि ती जोरात पाय घसरून पडली. तिथे उपस्थितीत असलेल्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेऊन तिला सावरलं. सुदैवाने या घटनेत 'आर्ची'ला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

मराठी सैराटच्या यशानंतर कन्नडामध्ये सैराटाचा रिमेक करण्यात आला होता. या सिनेमातही आर्चीची भूमिका रिंकू राजगुरूनेच साकारली होती. या चित्रपटानंतर रिंकूला दाक्षिणात्य इंडस्ट्रीचे दार मोकळे झाले आहे.

First published: November 9, 2017, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading