मुंबई 10 एप्रिल: रिमी सेन ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. ‘हंगामा’, ‘धूम’, ‘हेरा फेरी’, ‘दिवाने हुए पागल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु तब्बल एक दशक लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेली रिमी सध्या बेरोजगार आहे. तिला कामाची गरज आहे. मात्र याही परिस्थितीत तिनं सलमान खानची मदत घेण्यास नकार दिला आहे. तिला कुठल्याही प्रकारचे उपकार नकोयेत असं म्हणत तिनं भाईजानची मदत स्विकारण्यास नकार दिला आहे.
रिमी सेन गेली काही वर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. तिनं 2011 साली शागिर्द या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर तिनं काही काळ बॉलिवूडमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चूकला असं तिला वाटतंय. पुढे काही वर्ष तिला चित्रपटांच्या ऑफर मिळत होत्या परंतु कथानकात फारसा दम नसल्यामुळं तिनं नकार दिला. अन् आता अशी परिस्थिती उद्भवली आहे की तिला काम करायचंय पण तिला कोणी काम देण्यास तयार नाही.
अवश्य पाहा - 15 व्या वर्षी झाली कोट्यधीश; प्लास्टिक सर्जरीमुळं संपलं आयशा टाकियाचं करिअर
रिमीनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय चूकला. पण मी तरी काय करणार त्याच त्याच भूमिका साकारुन मला कंटाळा आला होता. मला विद्या बालनसारख्या हटके व्यक्तिरेखा साकारायच्या होत्या. पण अशा भूमिका मला मिळाल्याच नाहीत. माझे चित्रपट सुपरहिट होत होते. मानधन चांगलं मिळत होतं. पण काम करुन मला आनंद मिळत नव्हता. त्यामुळं काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत. नव्या अभिनेत्री प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यामुळं निर्मात्यांसमोर आता नवे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं ते मला नकार देतायेत, मला काही जणांनी सलमानची मदत घेण्याचा सल्ला दिला. परंतु मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. उगाच कोणीतरी तुमच्यावर उपकार करतंय अशी भावना मनात राहते. मला माझ्या टॅलेंटच्या जोरावर काम मिळवायचंय.” रिमीनं घेतलेल्या या निर्णयाची चाहते स्तुती करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.