• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम!

HBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम!

'क्यों की',(Kyon Ki) हंगामासारख्या (Hungama) चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री रिमी सेन(Rimi Sen) अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधून(Birthday Today) गायब आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- 'क्यों की',(Kyon Ki) हंगामासारख्या (Hungama) चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री रिमी सेन(Rimi Sen) अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधून(Birthday Today) गायब आहे. आज ही अभिनेत्री आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमीत्ताने जाणून घेऊया तिचं बॉलिवूड सोडण्यामागं नेमकं काय कारण होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Rimi Sen (@subhamitra03)

  टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री रिमी सेनने आपलं बॉलिवूड सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं. याचा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना अभिनेत्रीने म्हटलं होतं, 'मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या. त्या माझ्या आल्याचं नाहीत. मला प्रत्येक चित्रपटामध्ये फक्त एक शोभेची बाहुली म्हणून वावरायचं नव्हतं. मलाही काही लक्षवेधी भूमिका हव्या होत्या. मात्र असं नाही झालं आणि म्हणून मी चित्रपटांपासून दूर राहणं पसंत केलं. आज बॉलिवूड सोडून या अभिनेत्रीला जवळजवळ १० वर्षे झाली आहेत. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे हि अभिनेत्री पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. (हे वाचा:HBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट .  ) अभिनेत्री रिमी सेनचा जन्म  २१ सप्टेंबर १९८१ ला कोलकत्ता, पश्चिम बंगालमध्ये झाला होता. रिमचं खरं नाव रिमी नव्हे तर शुभोमित्रा सेन असं आहे. मात्र आज ती रिमी या नावानेच ओळखली जाते. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने खुलासा करत म्हटलं होतं. 'मी आपलं ग्रॅज्युएशन करू शकले नाही. त्यामुळे मला कोणतीच नोकरी मिळत नव्हती. मला क्लासिकल डान्स येत होतं. अभिनयाचीसुद्धा आवड होती. त्यामुळे माझं या क्षेत्रात येणं झालं'. २००३ मध्ये आलेल्या तुफान कॉमेडी 'हंगामा' या चित्रपटातून रिमी सेनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये परेश रावल, आफताब शिवदाससानी, अक्षय खन्ना, शोभना आनंद, राजपाल यादव, शक्ती कपूर  यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. हा चित्रपट आजही आपल्याला हसवून लोटपोट करतो. (हे वाचा:सासरेबुवा झालेतरी उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच....) बॉलिवूड चित्रपटांपासून दूर गेल्यांनतर रिमी सेन पहिल्यांदा बिग बॉसमधून पदड्यावर दिसून आली होती. रिमी सेन 'बिग बॉस ९' मध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती ५१ दिवस घरात टिकून होती. बिग बॉसमुळे ती अनेक वर्षांनंतर चर्चेत आली होती. या सीजनमध्ये नोरा फतेही, प्रिन्स नरूला, युवका चौधरी, रिषभ, दिगंगना, रूपल त्यागी, अंकित गेरा, किश्वर मर्चंट, सुयश राय, रोशेल यांसारखे अनेक कलाकार स्पर्धक होते. प्रिन्स नरूला या सीजनचा विजेता झाला होता. (हे वाचा:प्रिया वाढदिवसाला गेली होती या रम्य ठिकाणी; PHOTOs पाहून तुम्हीही पडला प्रेमात) मोजक्याच चित्रपटात काम करणारी रिमी सेन आजही सर्वांच्या लक्षात आहे. रिमीने गोलमाल, दिवाने हुए पागल, क्यों की, हंगामा, धूम, बागबान, गरम मसाला अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १० वर्षे बॉलिवूडमधून दूर राहून हि अभिनेत्री आत्ता पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: