मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राकेश-शमिताच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्याची EX-पत्नी जबाबदार? रिद्धी डोगराने नेटकऱ्यांना दिलं रोखठोक उत्तर

राकेश-शमिताच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्याची EX-पत्नी जबाबदार? रिद्धी डोगराने नेटकऱ्यांना दिलं रोखठोक उत्तर

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 10 ऑगस्ट- 'बिग बॉस'च्या माध्यमातून अनेक सेलेब्रेटींना आपलं खरं प्रेम मिळालं आहे. या शोमुळे अनेक जोड्या बनतात. यामध्ये काही दीर्घकाळ टिकतात तर काही बाहेर आल्यांनतर विभक्त होतात. अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचं असंच काहीसं झालं आहे. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांचे चाहते निराश झाले आहेत. मात्र काही सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या निर्णयाचा आदर करताना दिसत आहेत. त्याचवेळी काही युजर्सनी या ब्रेकअपसाठी राकेशची माजी पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगराला जबाबदार धरलं आहे. नेटकऱ्यांच्या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आता रिद्धीने रोखठोक उत्तर दिलं आहे. याबाबतीत उत्तर देत रिद्धी डोगराने ट्विटरवर एक निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये तिनं लिहिलंय, “ठीक आहे मित्रांनो. राकेशमुळे लोक विनाकारण माझ्याबाबतीत वाटेल ते बोलत आहेत, हे मी पाहात आहे. लग्नाआधी आणि नंतरही तो माझा मित्र आहे आणि मी माझ्या सर्व मित्रांच्या पाठीशी उभी आहे. आणि त्यांनी स्वतःसाठी जे काही ठरवलं आहे त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते.” अभिनेत्रीने पुढं लिहिलंय, 'मी त्या सर्वांना मिठी मारु इच्छितो, जी मला आज या सर्व प्रकाराने लाजवत आहेत. कारण राकेश आणि शमिताच्या ब्रेकअपमुळे ते निराश झाले आहेत. तुमच्या आवडत्या कलाकाराबाबतची ओढ,चैतन्य आणि प्रेम मी समजू शकते. त्यामुळे त्या सर्वांना वैयक्तिकरित्या मिठी मारायला मला आवडेल'.अभिनेत्री इतक्यावरच थांबली नाहीय. तर तिने आणखीही काही लिहलंय. (हे वाचा:Karan Mehra: 'ज्या भावाने कन्यादान केलं त्याच्यासोबतच आता अफेयर',करण मेहराचा पत्नी निशा रावलवर गंभीर आरोप ) रिद्धी डोगराने पुढं लिहिलंय की, “मला वाटते की तुम्ही सर्वजण खूप दुखावले आहात. पण या सर्व परिस्थिती मी सतत कारण नसताना ओढली जातेय. माझा या गोष्टीशी दूरदूर संबंध नाहीय. त्यामुळे कृपया तुमच्या स्वार्थासाठी ही नकारात्मकता थांबवा."असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांना सूचनावजा आवाहन केलं आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tv actress

पुढील बातम्या