मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /महिला डॉक्टरनं गायलं नुसरत यांचं गाणं, मंजुळ आवाजानं घातली सर्वांनाच भुरळ

महिला डॉक्टरनं गायलं नुसरत यांचं गाणं, मंजुळ आवाजानं घातली सर्वांनाच भुरळ

त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर गायलेली मंत्रमुग्ध करणारी गाणी आजच्या गायकांना गायला जमणार नाही असं अनेकदा म्हटलं जातं. (Pakistani Singer) परंतु हे अशक्यप्राय वाटणारं आव्हान एका पाकिस्तानी तरुणीनं स्विकारलं. अन् ते तितक्यात ताकदीनं तिनं ते पुर्ण देखील केलं.

पुढे वाचा ...

मुंबई 7 जून: नुसरत फतेही अली खान (Nusrat Fateh Ali Khan) हे आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मुळचे पाकिस्तानी असलेल्या या शास्त्रीय गायकांची गाणी भारतीय रसिक देखील मोठ्या आवडीनं ऐकायचे. चाहते त्यांना नुसरत साहेब या नावानं हाक मारायचे. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर गायलेली मंत्रमुग्ध करणारी गाणी आजच्या गायकांना गायला जमणार नाही असं अनेकदा म्हटलं जातं. (Pakistani Singer) परंतु हे अशक्यप्राय वाटणारं आव्हान एका पाकिस्तानी तरुणीनं स्विकारलं. अन् ते तितक्यात ताकदीनं तिनं ते पुर्ण देखील केलं.

रिदा खान (Rida Khan) असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी एक डॉक्टर आहे. तिनं काली काली जुल्फों को फंदे में ना डालो हे गाणं गायलं. हे शास्त्रीय गाणं तिनं अत्यंत सुंदर पद्धतीनं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. या व्हिडीओला काही तासंत 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’; NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

काही नेटकऱ्यांनी तर हे गाणं ऐकून तिची तुलना भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्याशी देखील केली आहे. रसिकांनी केलेली ही स्तुती पाहून रिदा भावूक झाली. अन् तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “कृपया माझी तुलना कोणाशी करु नका. तुम्ही भावनेच्या आहारात ज्या गायकांशी माझी तुलना करत आहात त्यांनी गाण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. त्यांच्या तुलनेत मी एक टक्का देखील संगीत शिकलेले नाही. मी केवळ त्यांना आदर्श मानून गाणं शिकत आहे.”

First published:

Tags: Shocking video viral, Song, Video viral