रिचा छड्डा एअर इंडियावर का भडकली?

सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री रिचा चड्डाचा नुकताच रुद्रावतार पहायला मिळाला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2017 03:26 PM IST

रिचा छड्डा एअर इंडियावर का भडकली?

14 डिसेंबर : सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री रिचा चड्डाचा नुकताच रुद्रावतार पहायला मिळाला. रिचाने चंदीगडहून मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईटची निवड केली होती. दुपारी साडे तीन वाजता रिचाचं फ्लाईट टेकऑफ होणार होतं, मात्र ऐनवेळी कोणतीही माहिती न देता हे फ्लाईट रद्द करण्यात आलं.

मग रिचानं ट्विटरच्या माध्यमातून एअर इंडियावरचा तिचा राग व्यक्त केला. फ्लाइट रद्द होणार असल्याचं आधीच का नाही कळवलं? लवकरात लवकर मला चंदीगढमधून बाहेर काढा असं रिचाने ट्विट केलं.

यानंतर या ट्विटची दखल घेऊन एअर इंडियाने तिची माफीही मागितली. मात्र संतापलेल्या रिचाने चक्क माझ्यासाठी खासगी विमानाची सोय करा असा सल्लाच एअर इंडियाला देऊन टाकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...