मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Richa-Ali Wedding: रिचाच्या हातावर चढला अलीच्या प्रेमाचा रंग; अभिनेत्रीची मेहंदी डिझाईन फारच खास

Richa-Ali Wedding: रिचाच्या हातावर चढला अलीच्या प्रेमाचा रंग; अभिनेत्रीची मेहंदी डिझाईन फारच खास

रिचा-अली

रिचा-अली

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली आहे. बॉलिवूडमधील चर्चित कपल्सपैकी एक रिचा चड्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 सप्टेंबर-   बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली आहे. बॉलिवूडमधील चर्चित कपल्सपैकी एक रिचा चड्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल 10 वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर लग्नगाठ बांधणार आहेत. दरम्यान या दोघांच्या प्री वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदीसुद्धा लागली आहे.रिचाने आपल्या मेहंदी डिझाईनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मेहंदीचं डिझाईन फारच खास आहे. यामध्ये नेमकं काय दडलंय ते पाहूया.

गेल्या अनेक वर्षांपासून रिचा आणि अलीच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. हे बोल्ड आणि बिनधास्त कपल कधी लग्नगाठ बांधणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून हे कपल त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. रिचा आणि अली हे दोघेही सध्या आपल्या प्री वेडिंग कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.

रिचा आणि अली फजलच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक कार्यक्रम पार पडत आहे. नुकतंच या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडल्याचं दिसून येत आहे. रिचाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या मेहंदीचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या हातावर भरगच्च मेहंदी काढण्यात आली आहे. रिचा व्हिडीओमध्ये आपल्या मेहंदीची डिझाईन फ्लॉन्ट करत आहे. ही डिझाईन खूपच युनिक आहे.

अभिनेत्री रिचाने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या हातावर काढण्यात आलेलय मेहंदीमध्ये मांजरीचा चेहरा बनवण्यात आला आहे. कारण अभिनेत्रींकडे दोन मांजर आहेत एकिचं नाव जुगनी आणि दुसरीचं नाव कमली असं आहे. या दोन्ही मांजरींवर रिचाचं प्रचंड प्रेम आहे. घरात ती सतत त्यांच्यासोबत धम्माल करत असते. बऱ्याचवेळा अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. तसेच मेहंदीमध्ये अली आणि रिचाच्या नावाचं पहिलं अक्षरदेखील काढण्यात आलं आहे.

(हे वाचा:Ranbir Kapoor: रणबीरने सेलिब्रेट केला लग्नानंतरचा फर्स्ट बर्थडे; आलियाने दिली जंगी पार्टी )

येत्या दोन दिवसांत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. रिचा आणि अलीचं लग्न खूप आधी झालं असतं. पण कोरोना महामारीमुळे त्यांनी बऱ्याचवेळा आपलं लग्न पुढे-पुढे ढकललं होतं. सध्या दोघंही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात थाटामाटात करत आहेत. हे लोक आपल्या लग्नाचे प्रत्येक कार्यक्रम आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत एन्जॉय करत आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Wedding couple