मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ठरलं! कतरिना कैफ-विकी कौशलनंतर बॉलिवूडचं हे स्टार कपल अडकणार लग्नाच्या बेडीत

ठरलं! कतरिना कैफ-विकी कौशलनंतर बॉलिवूडचं हे स्टार कपल अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.

मुंबई, 24 डिसेंबर-  रिचा चढ्ढा   (Richa Chadha)  आणि अली फजल   (Ali Fazal)  हे बॉलिवूडचे उत्कृष्ट कलाकार  आहेत. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2020 पासून या मैत्रीच्या नात्याला नवं नाव देण्यास दोघंही  तयार आहेत. परंतु कोरोनामुळे त्यांनी आपलं  लग्न   (Wedding)   पुढं  ढकललं आहे. दोघांबद्दल अशीही अफवा पसरली होती की लॉकडाऊन दरम्यान दोघांनीही गुपचूप लग्न केलं आहे. मात्र अलीनं आपण  अद्याप लग्न केलं नसल्याचं  स्पष्ट केलं आहे. 2021 च्या अखेरीस त्यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. 2022च्या शेवटी रिचा चड्ढा आणि अली फजल लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे.

अली फजल बोहल्यावर चढण्यास तयार आहे. मिडडेच्या रिपोर्टनुसार, दोघंही पुढच्या वर्षी मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, फुक्रे स्टार्स एक इंटिमेट  लग्न करणार आहेत.  आणि सध्या लग्नासाठी लोकेशन पाहात आहेत. लग्न मुंबई आणि दिल्लीत होऊ शकतं अशी चर्चा आहे. कोरोनामुळे अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या  हे जोडपं  लग्नासाठी  वेगवेगळी  ठिकाणं  पाहात आहे. आणि लवकरच लग्नाच्या ठिकाणाबाबत निर्णय घेणार आहे.

अली फजल आणि रिचा चड्ढा या दोघांनी मार्चमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.  कारण रिचा आणि अली फजलचे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये अनेक प्रोजेक्ट तयार आहेत. लग्नसराईच्यावेळी आपल्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी मार्च महिना निवडला असल्याचं सांगितलं जात आहे.

(हे वाचा:'माझ्याशी लगीन करणार का?' उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर चाहत्याला जडलं प्रेम )

एका मुलाखतीत लग्नाला उशीर का होत आहे असं विचारल्यानंतर रिचाने ही एक मोठी जबाबदारी असल्याचं  सांगितलं होतं. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी  लग्नाचा आनंद लुटावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे. आम्ही लग्नाला एक सुपर स्प्रेडर इव्हेंट बनवू इच्छित नाही. त्यावेळी तिनं म्हटलं, की आशा आहे की, पुढच्या वर्षी सर्व काही ठीक होईल, मगच आम्ही लग्न करू'. रिचा चड्ढा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे ती अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे

First published:

Tags: Bollywood News, Entertainment