मेहंदी है सजनेवली...! बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नाच्या बेडीत

मेहंदी है सजनेवली...! बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नाच्या बेडीत

एकीकडे अलिया-रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असताना बॉलिवूडचं एक हीट कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल ही जोडी मागच्या काही काळापासून जोरदार चर्चेत आहे. दोघंही नेहमीच एकमेकांसोबत दिसतात. या महिन्याच्या सुरुवातीला हे दोघंही जून किंवा जुलै महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकतील असा अंदाज लावला जात होता. मात्र अभिनेत्री ऋचा चड्ढानं या वृत्ताला खोडून काढत आम्ही दोघं जेव्हा लग्नाचा प्लान करु त्यावेळी सर्वांना सांगून करु अशी प्रतिक्रिया दिली होती.

रिचा चड्ढानं तिच्या लग्नाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगितलं असलं तरीही नुकतंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अली आणि रिचा यांनी आपापल्या कुटुंबीयांशी बोलून एप्रिल महिन्याच्या मध्यात लग्न करण्याचा प्लान केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अली आणि रिचा 15 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.

'कमल हसन यांनी मला जबरदस्तीनं KISS केलं होतं', अभिनेत्री रेखा यांचा आरोप

View this post on Instagram

One of my all time favourite photographs of life.. i miss . Arey Mohabbat. Happy Birthday. जन्म दिन मुबारक पार्ट्नर । दूरी भी अजीब चीज़ है - नई ख़ैर अजीब नहीं है , मैं कुछ पोएटिक लिखना चाह रहा था इस्स मौक़े पे। i guess , the photo says it all. Aur himmat bhi nahi hui. . @therichachadha . . . . . . “Yeh nahi jaanta kitna lamba hai safar.. Main shayad jaanta hoon kitna lamba hai safar. Kal bataaoonga. Tum milna . Waheen. Khaton ke teele pe . Kaagaz tumhaara hoga, kalam-dawaat meri, likhaayi tumhaari, chand bol mere, afsaane tumhaare, ghazlein meri, yeh silsila mera , yeh daastaan-e-मोहब्बत हमारी ! “ - M .

A post shared by ali fazal (@alifazal9) on

अलीनं रिचाला मालदीवमध्ये लग्नासाठी प्रपोज केलं होतं. या दोघांच्या लग्नाची ऑफिशिअल डेट किंवा वेडिंग कार्ड अद्याप समोर आलेल्या नाहीत. मात्र एप्रिल महिन्याचा 15 तारीखला लग्न करणार आहेत अशी माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. मागच्या 5 वर्षांपासून रिचा आणि अली एकमेकांना डेट करत आहेत.

सलमान खानच्या अडचणीत वाढ; अक्षय कुमार ठरला कारण, वाचा नक्की काय घडलं

रिचा चड्ढा आणि अली फजल यांचं लग्न हे अत्यंत खासगी स्वरुपाचं असणार आहे. अली आणि रिचा दोघं लखनऊ आणि दिल्लीतील असल्यानं त्यामुळे त्यांचं लग्न हे दिल्लीतच होईल. याशिवाय सर्व मित्रमंडळींसाठी 18 एप्रिलला लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील मित्रांसाठी वेगळं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे. सध्या रिचा आणि अली वेन्यूच्या शोधात आहेत. हे रिसेप्शन21 एप्रिलला मुंबईमध्ये होऊ शकतं.

View this post on Instagram

❤️ . . . #RichaTravels #BeachBum #BeachBae #travelgram #RichaChadha #VacayMode

A post shared by Richa Chadha (@therichachadha) on

रिचा चड्ढा आणि अली फजल यांचं नातं सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलं आहे. मागच्या 5 वर्षांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची ओळख 'फुकरे' सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे दोघं बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत.

VIDEO : SidNaaz पाहून शहनाझ गिल भडकली, रागात जाळून टाकले सर्व गिफ्ट

First published: February 26, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या