Home /News /entertainment /

अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल घोषच अडचणीत; ऋचा चड्ढाने ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल घोषच अडचणीत; ऋचा चड्ढाने ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

अभिनेत्री ऋचा चढ्ढा (Richa Chadda) ने पायल घोषविरोधात मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. ऋचाने तिच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

   मुंबई, 06 ऑक्टोबर: अभिनेत्री ऋचा चढ्ढा (Richa Chadda)ने पायल घोष (Payal Ghosh )विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. पायल घोषने अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने आपल्याविरोधात अयोग्य शब्द वापरले, असा दावा करत ऋचाने एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे.

  Bombay High Court defers the Rs 1.1 crores defamation suit filed by actor Richa Chadha against actor Payal Ghosh and others, in connection with the alleged sexual assault against actor Payal Ghosh, till 7th October as respondents were not served notices. pic.twitter.com/4csiutmxA0

  — ANI (@ANI) October 6, 2020 ऋचाने पायलसह आणखी 2 जणांविरुद्ध अब्रुुकसानीचा दावा केला आहे. तिच्या दाव्याला कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत स्थगिती दिली आहे.  "मी एक महिला आहे. आणि प्रत्येक महिलेला योग्य तो आदर मिळायला हवा. या मताची मी आहे. पण एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेवर बिनबुडाचे आरोप करताना विचार करायला हवा" असं मत ऋचा चढ्ढाने मांडलं आहे. ऋचा आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. पायल घोषने महिला आयोगामध्ये धाव घेतली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत तिने 'वाय' दर्जाची सुरक्षा मागितली आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: The Bombay High Court

  पुढील बातम्या