Home /News /entertainment /

अखेर रियाने ड्रग्सबाबत दिली कबुली; बॉलिवूड पार्टींबाबतही मोठा खुलासा, 25 कलाकारांनी NCB पाठवणार समन्स

अखेर रियाने ड्रग्सबाबत दिली कबुली; बॉलिवूड पार्टींबाबतही मोठा खुलासा, 25 कलाकारांनी NCB पाठवणार समन्स

सुशांत सिंह प्रकरणात अखेर रियाने यूटर्न घेतला असून तिने ड्रग्स प्रकरणाबाबत कबुली दिली आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात कथित ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यापूर्वी रियाने ड्रग्स घेत नसल्याचे सांगत होती. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवुड पार्टींबाबत माहिती दिली. आता एनसीबी ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे. यापूर्वी सोमवारी एनसीबीने 8 तास चौकशी केली होती. त्यावेळी रियाने सांगितले की, त्यावेळी तिने ड्रग्स घेतले नसल्याचे सांगितले.  याशिवाय सुशांतबाबत तिने महत्त्वपूर्ण खुलासे केले. रियाने एनसीबीला दिलेल्या जबाबात सांगितले की सुशांत सिंह 2016 पासून ड्रग्स घेत होता. फिल्म केदारनाथच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. रियाने सांगितले की, ती सुशांतच्या सांगण्यानुसार ड्रग्स मागवत होती. रियाने ती ड्रग्स घेत नसल्याचे सांगितले, यावेळी तिने सिगारेट आणि दारू पित असल्याचे मान्य केले. सुशांत आणि त्याच्या मित्रांचे BUDS रियाने पूर्वी सांगितले होते की, तिने कधीच ड्रग्स वा BUDS घेतले नाही. तिने कबुल केलं की दीपेशला ड्रग्ससाठी फोन केला होता मात्र तो सुशांतला हवा होता. सुशांतला BUDS ची गरज होती. ड्रग्स सुशांत आणि त्याच्या मित्रांसाठी हवं होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Sushant sing rajput

    पुढील बातम्या